Sports

IPL 2024 MI-GT: रोहित-हार्दिकच्या चाहत्यांची हाणामारी; स्टेडियमच्या स्टॅण्डमध्ये एकमेकांना लगावले थप्पड

IPL MI- GT : मुंबई आणि गुजरातच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये हाणामारी झालीय. नेटकऱ्यांच्या मते हाणामारी करणारे दोघेही रोहित आणि हार्दिकचे चाहते असल्याचं म्हटलं जात आहे.

Bharat Jadhav

Hardik And Rohit Fan Fight In MI-GT Match:

रोहित शर्मा आणि हार्दिकमधील वाद त्यांच्यापूरता मर्यादित राहिला नाहीये.या दोघांमधील शीत युद्धाचे पडसाद मैदानाबाहेरही पाहायला मिळत आहेत.दोन्ही खेळाडूचे चाहते एकमेकांना मारहाण करत आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रोहित आणि हार्दिकच्या चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.(Latest News)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव झाला. अवघ्या ६ धावांनी मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचा संघ यंदा हार्दिकच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या मैदानात उतरलाय. काल गुजरातबरोबर मुंबईचा पहिला सामना होता. या सामन्यादरम्यान हार्दिकची दादागिरी पाहायला मिळाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हार्दिकच्या वागणुकीवर मुंबई संघाचे आणि रोहितचे चाहते नाराज झाले आहेत. या नाराजीतून चाहत्यांमध्ये हाणाणारी होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये सामना पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये मारामारी झाली. नेटकऱ्याच्या मते, व्हिडिओत मार खाणारा मुलगा हा हार्दिकचा चाहता असल्याचं म्हटलं जातंय. या व्हिडिओ नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

नेटकरी का संतापले

मुंबई आणि गुजरातच्या सामन्यादरम्यान हार्दिकची दादागिरी पाहायला मिळाली. रोहितऐवजी हार्दिकला कर्णधार बनवण्यात आलंय.या निर्णयामुळे मुंबई आणि रोहितेच चाहते हार्दिकवर नाराज आहेत.रोहित शर्माचे चाहते त्याला चिडवत असतात. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा सामन्याची नाणेफेक होत असताना चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल केलं. त्याच्यासमोर रोहित रोहितच्या नावाच्या घोषणा दिल्या.त्यानंतर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर तो स्वत:पहिले षटक टाकण्यासाठी आला.

रोहित आणि बुमराहसोबत त्याने चांगली वागणूक दिली नाही. रोहित मुंबई संघाचा माजी कर्णधार आहे, पण हार्दिकने त्याला सामान्य खेळाडू सारखी वागणूक दिली.रोहित नेहमी ३० यार्डच्या आत क्षेत्ररक्षण करत असतो.पण हार्दिकने त्याला क्षेत्ररक्षणासाठी थेट सीमेरेषेवर पाठवलं.रोहितसोबत हार्दिकचं हे वागणं अनेक नेटकऱ्यांना आवडलं. हेच चाहत्यांच्या नाराजीच्या कारण आहे. रोहित आणि हार्दिकमधील वाद मैदानाबाहेर दिसून आला. हार्दिकने रोहितला दिलेल्या वाईट वागणुकीमुळे चाहते नाराज आहेत. जे चाहते हार्दिकचं कौतुक करत आहेत त्यांना रोहित शर्माचे चाहते ट्रोल करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: कांद्यावर काळे डाग येऊ नये म्हणून करा हे सोपे उपाय

Famous Actress : मुलीसाठी बापाने हद्द पार केली; लोकप्रिय अभिनेत्रीचं केलं अपहरण, धमकी दिली अन्..., वाचा नेमकं प्रकरण

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

LIC Vima Sakhi : LIC ची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००, अट फक्त १०वी पास

Weather Forecast: आजचे हवामान! ५ राज्यांना पावसाचा इशारा, तर १८ शहरावर दाट धुक्याचे सावट, महाराष्ट्रात काय स्थिती?

SCROLL FOR NEXT