ind vs aus yandex
Sports

Ind vs Aus Test : हा प्लान सक्सेस झाला तर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी टीम इंडियाचीच!

Harbhajan Singh : ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा कसोटी सामना आणि बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकायची असेल तर, टीम इंडियाला काय करावं लागेल, याबाबतचा प्लानच भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यानं सांगितला आहे.

Nandkumar Joshi

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना गाबा मैदानात होणार आहे. हा सामना जिंकला तर भारतीय संघ बॉर्डर - गावसकर ट्रॉफीही जिंकेल, असा विश्वास आणि दावा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यानं व्यक्त केला आहे. तिसरा कसोटी सामना आणि मालिका जिंकण्यासाठी स्पेशल प्लानही सांगितला आहे.

ब्रिस्बेनमध्ये १४ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. गाबा कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल, असंही हरभजन सिंग म्हणाला. पर्थ कसोटीनंतर बऱ्याच दिवसांनी तिसरा कसोटी सामना होत आहे. त्यामुळं टीम इंडियाला जी लय सापडली होती, ती तुटली असं मान्य करतानाच, दोन्ही संघांकडे 'कमबॅक' करण्याची जबरदस्त क्षमता आहे, असंही तो म्हणाला. भारतानं मायदेशात ३-० ने कसोटी मालिका गमावली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियानं वापसी करत अॅडलेड कसोटी सामना जिंकला.

ही मालिका खूपच कठीण आहे, कारण दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलियासोबत जे घडलं ते त्यांनाही अपेक्षित नव्हतं. तर अॅडलेडमध्ये जे टीम इंडियासमवेत जे घडलं, ते या संघासाठीही अनपेक्षित असेल, असे हरभजन सिंग स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला.

पर्थ आणि अॅडलेडमध्ये खेळवल्या गेलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांत बऱ्याच दिवसांचं अंतर होतं. अनेकदा हे जे अंतर आहे, ते लय बिघडवतात. इथेही असंच झालं असावं, असं सांगतानाच, गाबा कसोटी सामन्याबाबत त्यानं टीम इंडियाला सल्लाही दिला.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील पाचपैकी दोन सामने झाले आहेत. यात दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकला आहे. त्यामुळं सध्या दोन्हीही संघ बरोबरीत आहेत. समजा ही मालिका तीन सामन्यांची आहे, असं जर मानलं तर, टीम इंडियाला यापैकी दोन सामने जिंकावे लागतील. सिडनी आणि मेलबर्नमध्ये सर्वात जास्त संधी आहे, असं हरभजन म्हणाला.

जर तुम्ही गाबा कसोटीत सर्वोत्तम खेळ केला आणि तिथं जिंकलात, तर मेलबर्न किंवा सिडनीमधील एक सामना तर नक्कीच जिंकू शकता. त्यासाठी तुम्ही गाबा कसोटी जिंकण्याचा विचार करायला हवा. सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांत दोघांनी विजय मिळवला आहे. यावरून दोन्ही संघांमध्ये वापसी करण्याची क्षमता आहे. ऑस्ट्रेलियानं जोरदार कमबॅक केलंय. आता भारतीय संघाची वेळ आहे, अशी अपेक्षाही हरभजन सिंगनं व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT