Harbhajan Singh Saam tv
क्रीडा

Harbhajan Singh : सोशल मीडियावर पाकिस्तानी खेळाडूची धोनीसोबत तुलना; भडकलेल्या हरभजन सिंगने दिलं खणखणीत उत्तर

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज खेळाडू हरभजन सिंग सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असतो. याच हरभजन सिंगने सोशल मीडियावर एका पाकिस्तानी क्रीडा पत्रकराची चांगलीच शाळा घेतली. पाकिस्तानी क्रीडा पत्रकाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर महेंद्र सिंह धोनी आणि पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवान या दोघांची तुलना केली. या दोन्ही खेळाडूंच्या तुलनेवरून हरभजन सिंग भडकला. त्याने या पाकिस्तानी पत्रकाराला खणखणीत उत्तर दिलं.

पाकिस्तानात राहणारा फरीद खान हा क्रीडा पत्रकारिता करतो. त्याने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर महेंद्र सिंह धोनी आणि मोहम्मद रिझवान यांचा फोटो शेअर करत तुलना केली. त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'एमएस धोनी की मोहम्मद रिझवान? कोण चांगला खेळाडू आहे? मला प्रामाणिकपणे सांगा'.

हरभजन सिंगने दिलं खणखणीत प्रत्युत्तर

हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रीडा पत्रकाराला खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. 'आजकाल तुम्ही धूम्रपान करत आहात का? हा किती मूर्खपणाचा प्रश्न विचारला आहे. कोणीतरी सांगा. तुम्ही स्वत: रिझवानला प्रश्न विचारला तरी तो स्वत: सांगेल. तो चांगला खेळाडू आहे. मात्र ही तुलना ही चुकीची आहे. धोनी आजही क्रिकेट विश्वात एक नंबर आहे. काही वर्षांपूर्वी स्टम्पच्या मागे उभा राहून खेळणाऱ्या या खेळाडूसोबत कोणाची तुलना होऊ शकत नाही'.

दोघांमध्ये कोण सरस?

महेंद्र सिंह धोनीने २००४ ते २०१९ दरम्यान भारतासाठी ९० कसोटी सामने, ३६० वनडे, ९८ टी२० सामने खेळले आहेत. धोनीने कसोटी सामन्यात ४८७६ धावा कुटल्या आहेत. तर वनडेमध्ये १०७७३ धावा, टी२०मध्ये १६१७ धावा कुटल्या आहेत. दुसरीकडे मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी ३० कसोटी सामने, ७४ वनडे आणि १०२ टी२० सामने खेळले आहेत. मोहम्मद रिझवानने कसोटी सामन्यात १६१६ धावा, वनडेमध्ये २०८८ आणि टी२० सामन्यात ३३१३ धावा कुटल्या आहेत. दोघांची तुलना केली तर महेंद्र सिंह धोनी हा उजवा आहे.

दरम्यान, अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांनी हरभजन सिंगला पाठिंबा दिला आहे. अनेकांनी हरभजनच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर एकाने म्हटलं की, खूप छान हरभजन सिंग. तुझा खूप आदर वाटत आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

Lebanon pager explosion : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला, पेजर स्फोटांमागे कुणाचा हात? पाहा व्हिडिओ

Assembly Election: आमदारांमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर, अजित पवारांना हुरहुर?

SCROLL FOR NEXT