cheteshwar pujara saam tv
Sports

Cheteshwar Pujara Replacement: WTC मधील सुमार कामगिरी भोवणार? पुजाराची जागा घेण्यासाठी २९ वर्षीय फलंदाज सज्ज..

Team India: त्याच्याऐवजी २९ वर्षीय फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते.

Ankush Dhavre

Hanuma Vihari: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जुन दरम्यान लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय संघात काही बदल पाहायला मिळु शकतात.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला देखील हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याच्याऐवजी २९ वर्षीय फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर निवडकर्त्यांना संघात बदल करण्याचा विचार करण्यासाठी भाग पाडलं आहे.

चेतेश्वर पुजारा हा गेल्या काही महिन्यांपासुन इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत होता. त्याने या स्पर्धेत ससेक्स संघाचे नेतृत्व करताना दमदार कामगिरी केली होती. त्याने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात ७७ धावांची बहुमुल्य खेळी केली होती.

त्यानंतर बांग्लादेश संघाविरुद्ध ९० आणि १०२ धावांची खेळी केली होती. याव्यतिरीक्त २०२२ मध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याने २०२१- २३ हंगामातील १७ कसोटी सामन्यांमध्ये ९२८ धावा केल्या आहेत.

या खेळाडूला मिळू शकते संधी..

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २०२२ च्या सुरुवातीला कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेसाठी चेतेश्वर पुजाराच्या जागी हनुमा विहारीला संधी दिली गेली होती. त्याने ३ डावात फलंदाजी करताना एक अर्धशतक झळकावले होते.

मात्र चेतेश्वर पुजाराचं कमबॅक झाल्यानंतर हनुमा विहारीला संघाबाहेर केलं गेलं होतं. आता चेतेश्वर पुजारा पु्न्हा एकदा फ्लॉप ठरतोय. त्याचं वय देखील ३५ च्या पार गेलं आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता, चेतेश्वर पुजाराला बाहेर करुण हनुमा विहारीला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. (Latest sports updates)

हनुमा विहारीची कामगिरी...

हनुमा विहारीने आतापर्यंत १६ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३३.५६ च्या सरासरीने ८३९ धावा केल्या आहेत. त्याने भारतीय संघासाठी खेळताना १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना बर्मिंघममध्ये खेळला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माणगावमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता

Beed : बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या वैभवचा मृतदेह आढळला, बीडमधील धक्कादायक घटना

Shocking : नवी मुंबई हादरली! रात्री दोन तरुणींवर गोळीबार; परिसरात खळबळ

दिवाळीत भयंकर अपघात, ७ जणांचा मृत्यू; स्कूटीच्या अपघातानंतर मदतीसाठी धावले अन् भरधाव ट्रकने जमावाला चिरडले

Bank Holiday : धनत्रयोदशी बँक बंद राहणार की सुरु? जाणून घ्या RBI चे महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT