क्रीडा | IPL

IPL 2024 GT vs DC: दिल्लीपुढे गुजरातने टेकले गुडघे; अवघ्या ८९ धावांत संघ ऑलआऊट

Bharat Bhaskar Jadhav

Gujarat Titans vs Delhi Capitals: IPL 2024 च्या ३२ वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. या सामन्यात दिल्लीचे वर्चस्व राहत दिल्लीच्या गोलंदाजांसमोर गुजरातच्या संघाने नांगी टाकली. गुजरातचा अख्खा संघ मात्र ८९ धावांवर गारद झाला.

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंतचा हा निर्णय योग्य ठरवत गोलंदाजांनी गुजरातला गुडघे टेकण्यास भाग पाडलं. गुजरातचा संघ १७.३ षटकांत अवघ्या ८९ धावांत गारद झाला. हा सामना जिंकण्यासाठी दिल्लीला ४९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या मोसमातील हा चौथा सामना आहे. यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने घरच्या मैदानावर ३ पैकी २ सामने जिंकले आहेत.गेल्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सचा ३ गडी राखून पराभव केला होता. यातील शेवटचा विजय राजस्थान रॉयल्सविरुद्ध झाला. तर दिल्ली कॅपिटल्सची स्थिती फारशी चांगली नाही आणि संघाने ६ पैकी ४ सामने गमावलेत. परंतु शेवटच्या सामन्यात त्यांनी लखनऊला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Playoffs, Qualifier 1: पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

Thane Railway Station Fire : ठाणे रेल्वे स्टेशनवर जाहिरात फलकाला आग

BJP Vs RJD: ब्रेकिंग! बिहारमध्ये भाजप- आरजेडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, गोळीबारात एकाचा मृत्यू, २ जखमी; इंटरनेट सेवा बंद

Pune Hit and Run case : पुणे हिट अँड रन प्रकरण : पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, मुलाच्या वडिलानंतर आणखी तिघांना अटक

Today's Marathi News Live : भाजप नेते जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस

SCROLL FOR NEXT