Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाऊ शकते.
भारतीय संघाचे सामने हे पाकिस्तानच्या बाहेर खेळवले जाऊ शकतात. मात्र अद्यापही याबाबत कुठलीच माहिती समोर आली नाहीये. दरम्यान या स्पर्धेपूर्वी २२ वर्षीय युवा भारतीय खेळाडूने अवघ्या १२ चेंडूंचा सामना करत ५८ धावांची तुफानी खेळी केली आहे.
या खेळाडूने केली तुफान फटकेबाजी..
आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर आता तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत देखील युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सोमवारी (१२ जून) झालेल्या सामन्यात कोवई किंग्ज संघाकडून फलंदाजी करताना साई सुदर्शनने गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला आहे.
त्याने १९१.११ च्या स्ट्राईक रेटने ४५ चेंडूंचा सामना करत ८६ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या.
याचा अर्थ केवळ १२ चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक झळकावले आहे. या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाला ७० धावांनी विजय मिळवून दिला आहे. (Latest sports updates)
संघाला मिळवून दिला विजय..
साई सुदर्शनच्या या तुफानी खेळीच्या जोरावर कोवई किंग्ज संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात ७० धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना कोवई किंग्ज संघाने १७९ धावांचा डोंगर उभारला.
या धावांचा पाठलाग करताना विरोधी संघाचा डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्ठात आला. यासह कोवई किंग्ज संघाने या सामन्यात ७० धावांनी विजय मिळवला. साई सुदर्शनने आयपीएल २०२३ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने जोरदार कामगिरी केली होती.
गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्त करताना त्याने अंतिम सामन्यात ९६ धावांची खेळी केली होती. ज्यावेळी जोरदार फॉर्ममध्ये असलेला शुभमन गिल बाद होऊन माघारी परतला होता. त्यावेळी साई सुदर्शनने चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत संघाची धावसंख्या २०० पार पोहोचवली होती. त्याने या हंगामातील ८ सामन्यांमध्ये ३६२ धावा केल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.