Gujarat Titans entered IPL 2023 final
Gujarat Titans entered IPL 2023 final  saam tv
क्रीडा | IPL

MI vs GT Qualifier 2: हार्दिकने करून दाखवलं! गुजरात सलग दुसऱ्यांदा IPL फायनलमध्ये; मुंबईचा मोठा पराभव

Chandrakant Jagtap

Gujarat Titans vs Mumbai Indians Qualifier 2 : शुभमन गिलच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर गतविजेता गुजरात टायटन्सने क्वालिफायर-2 सामन्यात मुंबईचा 62 धावांनी पराभव करत धडाक्यात फायनलमध्ये एंट्री केली आहे. या पराभवासोबतच पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सचं सहाव्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचवण्याचं स्वप्न भंगलं आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेलेल्या या सामन्यात टॉस जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरातने शुभमन गिलच्या वादळी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 233 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिलने अवघ्या 49 चेंडूत या हंगामातलं तिसरं शतक ठोकलं.

प्रथम फलंदाजीसाठी करताना गुजरातच्या रिद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी पावर प्लेमध्ये संयमी खेळी केल्यानंतर जोरदार फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर रिद्धिमान साहा बाद झाला. पण शुभमन गिलने साई सुदर्शनसोबत मिळून स्कोअरबोर्ड धावता ठेवला. शुभमन गिलने 60 चेंडूत 129 धावांची वादळी खेळी केली.

शुभमन गिलच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकात 3 बाद 233 धावांचा डोंगर उभारला. गिलशिवाय रिद्धिमान साहाने 18, साई सुरर्शन 43, हार्दिक पांड्या 28 आणि राशिद खानने 5 धावा केल्या. मुंबईकडून आकाश मढवालने 1 आणि पियुष चावलाने 1 विकेट घेतली.

गुजरातने दिलेल्या 234 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला सुरुवातीला दोन मोठे धक्के बसले. इशान किशन दुखापतग्रस्त झाल्याने रोहितसोबत नेहाल वढेरा सलामीसाठी आला होता. परंतु पहिल्याच षटकात तो शमीचा बळी ठरला. त्यानंतर रोहित शर्मा देखील मोठी खेळी करू शकला नाही. मात्र त्यानंतर आलेल्या कॅमरून ग्रीन आणि तिलक वर्मा यांनी मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आणि वेगाने धावसंख्या उभारली. परंतू जोशवा लिटलच्या चेंडूवर ग्रीन 30 धावा करून बाद झाला. (Shubman Gill Century)

त्यानंतर सुर्यकुमार यादवने तिलक वर्मासोबत मिळून वेगवान खेली सुरु ठेवली. तिलक वर्माने धडाकेबाज खेळी करत 14 चेंडूत 43 धावा ठोकल्या. परंतु राशीद खानच्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादववर संघाची धुरा होती. सूर्यकुमारने मुंबईचा धावफलक हालता ठेवला. परंतु मोहित शर्माच्या चेंडूवर तो 38 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. यानंतर मुंबईच्या कोणत्याच फलंदाजाला फार वेळ मैदानावर तग धरता आला नाही. अखेर मुंबईला 62 धावांनी पराभव स्विकारावा लागला. (Sports News)

शुभमन गिलचे तिसरे शतक

या शुभमन गिलने तुफान फटकेबाजी करत आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. या स्पर्धेत त्याने ३ शतके झळकावली आहे. यासह आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएल स्पर्धेच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम हा विराट कोहली आणि जोस बटलरच्या नावे आहे. विराट कोहली आणि जोस बटलर यांनी प्रत्येकी ४-४ शतके झळकावली आहेत. आता शुभमन गिलने ३ शतके झळकावली आहेत. (Latest sports updates)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुणे शहर मनसेचा आज मेळावा

Manoj Jarange Patil News | मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत मराठा समाजाला काय आवाहन केलं?

Whatsapp: ‘या’ चुकांमुळे होऊ शकतं तुमचं व्हॉट्सअ‍ॅप बॅन

Sanjay Raut News | तर अजित पवारांना दुध विकावं लागलं असतं, राऊत यांचा घणाघात

Sahil Khan Arrest : मोठी बातमी!, साहिल खानाला मुंबईत आणलं; कोर्टाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT