Shubman Gill Success Story : मुंबईची धुलाई करणाऱ्या शुभमन गिलच्या धासू टायमिंगमागची 'बाप' गोष्ट

MI vs GT Qualifier 2: शुभमन गिल इतका भारी कसा काय खेळतो? त्यामागचं खरं कारण काय? त्याचं टायमिंग इतकं लाजवाब कसं काय? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर थोडं मागे जावं लागेल.
Shubhan Gill Success Story
Shubhan Gill Success Storysaam tv

IPL 2023 Shubman Gill Success Story: मुंबईविरुद्ध क्लालिफायर-2 सामन्यात शुभमन गिलने वादळी खेळी केली. फायनलआधीच्या मॅचमध्ये शुभमन गिल जे खेळला, ते बघून मुंबईकरांना घामच फुटला असेल. पण जो क्रिकेटचा खरा चाहता आहे, त्याला शुभमनची बॅटिंग पाहून अभिमानच वाटला असणार.

क्रिकेट फॅन्सचं भरपूर मनोरंजन शुभमन गिलने आपल्या बॅटिंगने केलंय. याच शुभमन गिलची अशी एक गोष्ट आहे, जी फारशी कुणाला माहीत नाही, ती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शुभमन गिल इतका भारी कसा काय खेळतो? त्यामागचं खरं कारण काय? त्याचं टायमिंग इतकं लाजवाब कसं काय? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर थोडं मागे जावं लागेल.

एक लखविंदर सिंह नावाचा मुलगा होता. लखविंदरला क्रिकेटर व्हायचं होतं. पण संधी मिळत नव्हती. बाकीची परिस्थितीही संधी मिळावी अशी नव्हती. गावात राहणाऱ्या लखविंदरने क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहिलं. पण गावातल्या या मुलाला क्रिकेटर होणं शक्य नाही, हे कळून चुकलं होतं. आपलं स्वप्न अधुरं राहणार याची जाणीवही त्याला होती. नंतर लखविंदरचं लग्न झालं. त्याला एक मुलगा झाला. आपलं स्वप्न मुलगा पूर्ण करेल, असं लखविंदरला वाटू लागलं. त्यासाठी लखविंदरने प्रयत्न सुरु केले.

Shubhan Gill Success Story
Shubman Gill Century: शुभमनला नमन! मधवालला 'आकाश' दाखवत ठोकलं खणखणीत शतक; या विक्रमांची झाली नोंद

बघता बघता वडिलांचं स्वप्न साकार करणं मुलाचं ध्येय बनलं. वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हेच आपलं स्वप्न, हे त्या मुलाने ठरवून टाकलं. इतकंच नाही, तर मुलाने वडिलांच्या स्वप्नाला सत्यातही उतरवलं. या मुलाचं नाव म्हणजेच शुभमन गिल!

शुभमन गिलचे (Shubhan Gill) पहिले कोच दुसरे तिसरे कुणी नाही, तर त्याचे वडील लखविंदर सिंग हेच आहेत. शुभमन जेव्हा लहान होता, तेव्हा तो वडिलांच्या शेतात प्रॅक्टिस करायचा. त्याचा क्रिकेटमधला इंटरेस्ट वाढावा म्हणून शुभमनच्या बाबांनीच त्याला ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला. याच ट्रेनिंगच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी चकीत करणाऱ्या आहेत.

लहान असताना शुभमन गिल तब्बल 500 ते 700 बॉल दर दिवशी खेळायचा. फास्ट बॉलिंग चांगली खेळता यावी, म्हणून त्याचे वडील चक्क चारपायीवर चढून गोलंदाजी करायचे. शिवाय शुभमनला बॅट ऐवजी फक्त स्टम्पनेही त्याच्या वडिलांनी बॅटिंग करायला लावली होती. यामुळेच बॉल चांगला मिडल कसा करायचा, हे शुभमन फार लहान वयातच शिकला. पण आपलं ट्रेनिंग कुठपर्यंत पुरणार, हे त्या बापाला चांगलंच ठाऊक होतं. लखविंदर हे प्रोफेशन क्रिकेट कोच नव्हते. त्यांना आपल्या मर्यादा माहिती होत्या.

वर्ष होतं 2007. शुभमन गिल तेव्हा अवघ्या 8 वर्षांचा होता. वडील शुभमनला घेऊन गावातून मोहालीत आले. यामागचं कारण होतं शुभमनला क्रिकेटन बनवणं! एखाद्या सिनेमासारखीही शुभमनची ही स्टोरी होती. शुभमनला जास्त चांगलं आणि प्रोफेशनल ट्रेनिंग मिळावं, म्हणून वडील त्याला घेऊन मोहालीत आले आणि पुढे जे काय झालं.. ते तुम्ही बघतच आहात.

Shubhan Gill Success Story
GT vs MI Qualifier 2: गिलने मुंबईला धू धू धुतलं! गुजरातने उभा केला धावांचा डोंगर, मुंबई करणार का सर?

शुभमनच्या वडिलांनी शुभमनसाठी स्वतःच्या शेतात पिच बनवलं होतं. तिथेच मुलाला ट्रेनिंग दिलं. वडिलांनी पाहिलेलं स्वप्न मुलाने पूर्ण केलं. तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण शुभमनच्या वडिलांनी त्याच्यावर 100 रुपयांचं बक्षिसही ठेवलं होतं. असं का? कशासाठी?

शेतातल्या पिचवर जेव्हा शुभमनचे वडील तासनतान बॉलिंग करायचे. तेव्हा शुभमन काही केल्या आऊटच व्हायचा नाही. म्हणून वडिलांनी एक शक्कल लढवली. ही शक्कल फारच इंटरेस्टिंग होती. वडिलांना माहीत होतं. की पोरगं काही आऊट होणार नाही. म्हणून त्यांनी 100 रुपयांचं बक्षीसच शुभमनला आऊट करण्यासाठी ठेवलं होतं. गावातला जो पोरगा आपल्या पोराला आऊट करुन दाखवेल, त्याला 100 रुपये बक्षीस अशी शक्कल शुभमनच्या पप्पांनी लढवली होती. (Latest sports updates)

शुभमनचा 'सारा' हिसाबकिताब

- 8 सप्टेंबर 1999 ला शुभमन गिलचा जन्म

- 2018 पासून आयपीएल खेळतोय

- 2023मध्ये तीन शतक झळकावलेत.

- 2018 पासून ते आतापर्यंत शुभमनचा स्ट्राईक रेट हा 115 पेक्षा जास्तच राहिलाय.

- विराट कोहलीची गादी चालवणारा क्लास प्लेअर म्हणून शुभमन गिलकडे पाहिलं जातं.

- अंडर 19 वर्ल्डकपमध्ये शुभमन प्लेअर ऑफ टुर्नामेन्ट होता.

- केकेआरपासून शुभमनने आयपीएल खेळायला सुरुवात केली होती.

- केकेआरने तेव्हा 1 कोटी 80 लाखात शुभमनला विकत घेतलं होतं.

- शुभमन गिल आता गुजरातकडून खेळतो.

- शुभमन गिल हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने अंडर 19 मध्ये 100 पेक्षा जास्तच्या एव्हरेजने रन्स केलेत.

- विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे शुभमन गिलचे फेव्हरेट आहेत. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com