gujarat titans captain shubman gill meets his ipl teammates robin minzs father video went viral  instagram
Sports

Shubman Gill: आधी संघात घेतलं आता वडिलांची घेतली भेट; आदिवासी क्रिकेटपटूच्या वडिलांची अन् गिलची ग्रेट भेट -Video

Shubman Gill Meets Robin Minz Father: भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यावर त्याने हटके कॅप्शन देखील दिलं आहे.

Ankush Dhavre

Shubman Gill With Robin Minzs Father:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिकी सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवत मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. हा सामना झाल्यानंतर भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यावर त्याने हटके कॅप्शन देखील दिलं आहे.

शुभमन गिल आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचं प्रतिनिधित्व करतो. आगामी हंगामात याच संघाकडून रॉबिन मिंज देखील खेळताना दिसून येणार आहे. गिलने रॉबिन मिंजचे वडील फ्रांसिस मिंज यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो रांची विमानतळावरील आहे.

गिलने घेतली रॉबिन मिंजच्या वडिलांची भेट..

रांची विमान तळावर पोहोचल्यानंतर गिलने फ्रांसिस मिंज यांची भेट घेतली. यादरम्यान दोघांमध्ये संवादही झाला. या दोघांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फ्रांसिस मिंज यांनी शुभमन गिलला चौथा कसोटी सामना जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. रॉबिन मिंज आगामी आयपीएल स्पर्धेत शुभमन गिलसोबत खेळताना दिसून येणार आहे.

या दोघांच्या भेटीचा फोटो गिलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने, 'रॉबिन मिंजच्या वडिलांना भेटून आनंद झाला. तुमची मेहनत आणि प्रवास प्रेरणादायी आहे. तुम्हाला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याला गुजरात टायटन्सने ३.६ कोटी किंमत मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

रॉबिन मिंजचे वडील रांची विमानतळावर सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत आहेत. आयपीएल स्पर्धेचा लिलाव झाल्यानंतर रॉबिन मिंजच्या वडिलांनी खुलासा केला. लिलावापूर्वी फ्रांसिस मिंज आणि एमएस धोनी यांची भेट झाली होती. त्यावेळी धोनीने त्यांना सांगितलं होतं की, लिलावात तुमच्या मुलावर कोणीही बोली लावली नाही,तर सीएसके त्याला आपल्या संघात स्थान देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT