hardik pandya  saam tv
Sports

Hardik Pandya: गिल, शमी नव्हे तर 'हा' आहे गुजरातचा मॅचविनर खेळाडू! स्वतः हार्दिकने केलं कौतुक

Hardik Pandya On Win Against MI : मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

GT VS MI, IPL 2023: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये शनिवारी क्वालिफायर २ चा सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने मुंबई इंडियन्स संघावर ६२ धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्यात १२९ धावांची खेळी करणारा शुभमन गिल विजयाचा हिरो ठरला आहे. आता अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होणार आहे.

दरम्यान मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

हा सामना झाल्यानंतर हार्दिक पंड्या म्हणाला की, 'मला असं वाटतं की, चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूच्या मागे मेहनतही तितकीच असते. त्याचा आत्मविश्वास वाढला आहे, ज्यामुळे तो अप्रतिम कामगिरी करतोय. शुभमनने आज केलेली खेळी ही सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. तो जराही गडबडलेला दिसून आला नाही . असं वाटतं होतं की, कोणीतरी बॉल फेकत आहे आणि हा इथून मारतोय. येणाऱ्या काळात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि फ्रँचायजी क्रिकेटचा स्टार असेल.'

तसेच नेतृत्वाबाबत बोलताना तो म्हणाला की, 'नेतृत्व करणं मुळीच सोप नाहीये. आम्ही आमच्या खेळाडुंनी केलेल्या मेहनतीमुळे अंतिम फेरीत पोहोचलो आहोत. राशिद खान असा खेळाडु आहे जो दबावात आणखी चांगली कामगिरी करतो. जेव्हा संघ अडचणीत असतो, त्यावेळी मी राशिद खानकडे जातो. आम्ही मैदानात असताना १०० टक्के देण्याच्या प्रयत्नात असतो. नॉकआऊटचे सामने कधीही फिरु शकतात. मात्र आम्ही अंतिम सामना खेळण्यासाठी उत्साही आहोत.' (Latest sports updates)

मुंबईला पराभुत करत गुजरातचा संघ अंतिम फेरीत दाखल..

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक ६० चेंडुचा सामना करत १२९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि १० गगनचुंबी षटकार मारले.

तसेच साई सुदर्शनने ४३ धावांची विस्फोटक खेळी केली. शेवटी कर्णधार हार्दिक पंड्याने २८ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या २३३ पर्यंत पोहचवली.

मुंबई इंडियन्स संघाकडून या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ४३ आणि कॅमेरून ग्रीनने ३० धावांची बहुमूल्य खेळी केली. मात्र मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात ६२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा युनेस्को यादीत समावेश

Raigad To Shivneri Travel: रायगडाहून शिवनेरीकडे कसे कराल प्रवास? जाणून घ्या सर्वोत्तम रस्ते मार्ग आणि ट्रॅव्हल टिप्स

Akkha Masoor Bhaji Recipe : अक्खा मसूर भाजी अन् गरमागरम चपाती, मुलांच्या टिफिनचा हेल्दी बेत

Air India Plane Crash: 'टेकऑफनंतर ३ सेकंदात दोन्ही इंजिन बंद', २७५ जणांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

Tabu : घट्ट मिठी अन् तोंड भरून कौतुक; महेश मांजरेकरांना पुरस्कार देताना तब्बू मराठी भाषेत झाली व्यक्त, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT