Rajasthan Royals beat Gujarat Titans by 3 wickets saam tv
Sports

GT vs RR: 'शिमरॉन' वादळाचा गुजरातला तडाखा! रोमांचक सामन्यात राजस्थानचा 3 विकेटने दमदार विजय

IPL 2023, GT vs RR: संजू सॅमसनच्या धडाकेबाज खेळीनंतर शिमरॉन हेटमारयने राजस्थानला शानदार विजय मिळवून दिला.

Chandrakant Jagtap

Gujarat Titans vs Rajasthan Royals: आयपीएलच्या 23व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर 3 विकेटने शानदार विजय मिळवला आहे. राजस्थानचा मॅच फिनिशर खेळाडू शिमरॉन हेटमायरने 26 चेंडू तूफानी 56 धावांची खेळी करत राजस्थाना विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने दिलेले 178 धावांचे लक्ष राजस्थाने संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर 19.2 षटकात पूर्ण केले.

लक्षाचा पाठलाग कऱण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली. दोन्ही सलामीवर यशस्वी जैस्वाल (1) आणि जोश बटलर (0) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला.

देवदत्त पडीक्कल 25 चेंडूत 26 धावा करून बाद झाला, तर संजू सॅमसनने 32 चेंडूत 60 धावांची तूफानी खेळी केली. त्यानंतर ध्रूव जुरेल आणि रविचंद्रन अश्विनच्या साथीने शिमरॉन हेटमारयने राजस्थानला शानदार विजय मिळवून दिला. हेटमायरने 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 26 चेंडूत 56 धावांची केळी केली.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेलेल्या या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 177 धावां केल्या. गुजरातकडून डेव्हिड मिलरने 46 आणि शुभमन गिलने 45 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 28, अभिनव मनोहरने 27 आणि साई सुदर्शनने 20 धावांचे योगदान दिले.

ऋद्धिमान साहा चार आणि रशीद खानने एक धाव काढून बाद झाला. राजस्थानकडून संदीप शर्माने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात केवळ 25 धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले. याशिवाय ट्रेंट बोल्ट, अॅडम झाम्पा आणि युझवेंद्र चहल यांना देखील प्रत्येकी एक विकेट मिळाली. (IPL 2023)

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c/wk), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (क), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवाटिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा. (Latest Sports News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT