mumbai indians twitter
Sports

GT vs MI Turning Points: एका चुकीमुळे मुंबईचं सहाव्यांदा जेतेपद मिळवण्याचं स्वप्नं तुटलं; पाहा तो क्षण

GT vs MI, Qualifier 2: क्वालिफायर २ च्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ६२ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

GT vs MI, IPL 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. क्वालिफायर २ च्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ६२ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

दरम्यान या सामन्यात शुभमन गिलने तुफानी खेळी करत या हंगामातील तिसरे शतक झळकावले. दरम्यान गिलला दिलेलं जीवदान मुंबई इंडियन्स संघाला महागात पडलं आहे.

शुभमन गिलने या डावाच्या सुरुवातीपासूनच मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. त्याने अवघ्या ६० चेंडूंचा सामना करत १२९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि १० षटकार मारले. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद २३३ धावा केल्या होत्या.

टीम डेव्हिडची एक चूक

एका झेलमुळे मुंबई इंडियन्स संघाला ९९ धावांचा फटका बसला. ते कसं? तर समजून घ्या. मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाजी सुरू असताना सहावे षटक टाकण्यासाठी ख्रिस जॉर्डन गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या शुभमन गिलने मिड ऑनच्या दिशेने शॉट मारला.

त्यावेळी गिलला बाद करण्याची संधी समोरून चालत आली होती. मात्र क्षेत्ररक्षण करत असलेल्या टीम डेव्हिडकडून सोपा झेल सुटला. त्यावेळी शुभमन गिल अवघ्या ३० धावांवर फलंदाजी करत होता. जर टीम डेव्हिडने तो झेल टिपला असता, तर शुभमन गिलला १२९ धावांची खेळी करता आली नसती. (Latest sports updates)

गुजरातचा जोरदार विजय..

या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईच्या दिशेने लागला होता. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईच्या या निर्णयावर शुभमन गिलने पाणी फेरलं. त्याने सलामीला फलंदाजीला येत ७ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ६० चेंडूंमध्ये १२९ धावांची खेळी केली.

तर त्याला चांगली साथ देत साई सुदर्शनने ३१ चेंडूंचा सामना करत ४३ धावांची खेळी केली. तर शेवटी हार्दिक पंड्याने नाबाद २८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद २३३ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना मुंबईची सलामी जोडी आली तशी माघारी परतली. मुंबई कडून कर्णधार रोहित शर्माला ८ धावांचं तर नेहाल वढेराला ४ धावांचं योगदान देता आलं. तर सूर्यकुमार यादवने मुंबईला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ३८ चेंडूंचा सामना करत ६१ धावांची खेळी केली.

तर तिलक वर्माने ४३ धावांचे योगदान दिले. दुखापतग्रस्त असलेल्या कॅमेरून ग्रीनने ३० धावांचे योगदान दिले. मात्र मुंबईचा संघ विजयापासून ६२ धावा दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : भगवान गणेशाची कृपा होणार, गुप्तधनाचे मार्ग सापडतील; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार, वाचा

Local Body Polls 2025 : 'पालिका निवडणुकीत VVPT नाही'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, VIDEO

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

SCROLL FOR NEXT