Sports

Gujarat Titans vs Mumbai Indians: सुदर्शनचं तडाखेबाज अर्धशतक; मुंबई इंडियन्ससमोर १९७ धावांचे आव्हान

Gujarat Titans vs Mumbai Indians: आज IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत.

Bharat Jadhav

IPL 2025 चा 9 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मोसमात दोन्ही संघांना अजून विजय मिळवता आला नाहीये. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावत १९६ धावा केल्या.

मुंबईने फलंदाजीचं आमंत्रण दिल्यानंतर गुजरातच्या सलामीवीरांनी धमाकेदार फटकेबाजी केली. पावरप्लेमध्ये गुजरातने बिनबाद ६६ धावा केल्या. गुजरातने मुंबईला पहिल्या विकेटसाठी चांगलेच रडवलं. मुंबईविरुद्ध साई सुदर्शनची शानदार खेळी केली. त्याने यंदाच्या आयपीएलमधील २ रं अर्धशतक पूर्ण केले. शुभमन आणि सुदर्शन यांच्यात पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी झाली.

मुंबईच्या गोलंदाजांना दोन्ही फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. शेवटी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. हार्दिकने गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला बाद केले. शुभमनने २७ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३८ धावा केल्या. गिल बाद झाल्यानंतर जोस बटलर मैदानात आला. त्याने सुदर्शनच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावा जोडल्या. जोस बटलरने २४ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३९ धावा केल्या. बटलरला अफगाणचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानने बाद केले. बटलर बाद झाल्यानंतर काही वेळातच साई सुदर्शनने आपले अर्धशतक पूर्ण केले.

बटलरची विकेट गेल्यानंतर शाहरूख खान मैदानात उतरला पण तोही खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याने फक्त ७ चेंडूत ९ धावा केल्या. त्यालाही हार्दिकने माघारी पाठवलं. शाहरुख बाद झाल्यानंतर शेरफेन रदरफोर्ड आणि सुदर्शन यांच्यात चौथ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी झाली. यानंतर गुजरातने सलग ३ चेंडूत ३ विकेट गमावल्या. ट्रेंट बोल्टने १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर साई सुदर्शनचा त्रिफळा उडवला.

सुदर्शनने ४१ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. त्यानंतर १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर राहुल तेवतिया धावबाद झाला. तर दुसऱ्या चेंडूवर दीपक चहरने शेरफेन रदरफोर्डला बाद केले. विकेटची पडझड सुरू झाल्याने गुजरातचा संघ २०० धावांचा आकडा गाठू शकला नाही. अखेरच्या षटकात गुजरातने दोन गडी गमावले. सत्यनारायण राजूच्या षटकात राशिद खान (७) आणि आर. साई किशोर (१) धावांवर बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT