TataIpl Final 2023  Saamtv
Sports

IPL Final 2023 CSK vs GT: धोनीला हरवणं सोप्प नव्हं! CSK च्या 'या' पाच गोष्टी ठरणार 'हार्दिक'साठी घातक?

IPL Final GT vs CSK: आजच्या हाय होल्टेज सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Gangappa Pujari

IPL Final 2023 CSK Vs GT: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ (IPL2023) ची फायनल आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये होणार आहे. गुजरातला जेतेपद कायम राखून इतिहास घडविण्याची, तर चेन्नईला मुंबई इंडियन्सच्या ५ जेतेपदांची बरोबरी करण्याची संधी आहे. त्यामुळेच या हाय होल्टेज सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

एकीकडे जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेली हार्दिकची गुजरात तर दुसरीकडे नवख्या खेळाडूंसोबत मास्टरमाईंड धोनीची चेन्नई मैदानात लढाईसाठी सज्ज आहे. मात्र दोन्ही संघांचा विचार करता पाच कारणांमुळे धोनीच्या संघाचे पारडे जड वाटत आहे. कोणते आहेत धोनीचे एक्स फॅक्टर चला जाणून घेवू..

१. मास्टरमाईंड धोनी- चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात ताकदवान चेहरा म्हणजे स्वतः कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni). कॅप्टन कूल अशी ओळख असलेला धोनी त्याच्या मैदानावरील डावपेचाने विरोधकांना चारीमुंड्या चित करतो. तसेच धोनीकडे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची, प्रत्येक खेळाडूचा कल्पकपणे वापर करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तसेच महेंद्रसिंग धोनीकडे सर्वाधिक फायनल खेळण्याचा अनुभव आहे, ज्याचा त्याला मोठा फायदा होवू शकतो.

२. सलामी जोडी: चेन्नईची दुसरी जमेची बाजू म्हणजे त्यांची सलामीची जोडी. या हंगामातील चेन्नईच्या फायनलपर्यंतच्या प्रवासात या जोडीने महत्वाचे योगदान दिले आहे. ऋतुराज गायकवाड आणि  डेवॉन कॉनवेच्या तडाखेबंद खेळीने चेन्नईची फलंदाजी मजबूत केली आहे.

3. छोटा पॅकेट बडा धमाका- कॅप्टन कूलच्या संघात एकही मोठा गोलंदाज नसला तरी नवख्या तृषार देशपांडे आणि मथीसा पाथिरानाने याची उणीव मात्र जाणवू दिली नाही. ही चेन्नईसाठी फायद्याची आणि हार्दिकसेनासाठी धोक्याची घंटा आहे. चेन्नईकडून खेळताना तृषार देशपांडे पावरप्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत आहे. तर पाथिराणा डेथ ओव्हर्सचा किंग बनला आहे.

4. शिवम दुबे- चेन्नईकडून एकीकडे ऋतुराज आणि कॉन्वे सुरूवातीला फलंदाजीची कमान सांभाळत असतानाच मधल्या फळीत शिवम दुबेची स्फोटक खेळी निर्णायक ठरत आहे. ज्याचा थेट फायदा मोठी धावसंख्या उभारण्यासाठी होत आहे.

५. अनुभव- शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे चेन्नईकडे असलेला अनुभव... आयपीएलच्या १४ वर्षाच्या काळात या संघाने तब्बल १० वेळा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे धोनीसेनाकडे असलेला अनुभव ही सर्वात मोठी आणि जमेची बाजू ठरु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT