CSK vs GT, IPL 2024, Ruturaj Gaikwad SAAM TV
Sports

Ruturaj Gaikwad : CSK चा पराभव कुठे निश्चित झाला? ऋतुराज गायकवाडनं सांगितल्या त्या २ चुका

CSK vs GT, IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी संघाने केलेल्या चुका स्पष्टपणे सांगितल्या.

Nandkumar Joshi

बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जला गुजरात टायटन्सनं ३५ धावांनी पराभूत केलं. अहमदाबादच्या मैदानात गुजरातनं २३१ धावांचा डोंगर उभा केला. हा आव्हानाचा डोंगर चेन्नईला पेलवला नाही. त्यांना १९६ धावाच करता आल्या. या सामन्यात पराभव नेमका कुठे निश्चित झाला? चुकलं कुठं? हे सांगतानाच कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं पुढच्या सामन्याबाबत संघ सहकाऱ्यांना सावधही केलं.

आयपीएलच्या (IPL 2024) ५९ व्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून चेन्नई सुपरकिंग्जला (Chennai Super Kings) ३५ धावांनी पराभव पत्करावा लागला. अहमदाबादच्या मैदानात गुजरातनं नाणेफेक गमावली. प्रथम फलंदाजीला उतरावं लागलं. साई सुदर्शन आणि शुबमन गिल या दोघांनीही शतकं झळकावली. संघाची धावसंख्या २३१ पर्यंत पोहोचवली.

हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला चेन्नई संघ सुरुवातीलाच धडपडला. २० षटकांत ८ विकेट गमावून १९६ धावा केल्या. सलामीला आलेला अजिंक्य रहाणे (१ धाव), रचिन रविंद्र (१ धाव) स्वस्तात माघारी परतले. कर्णधार ऋतुराज गायकवाड हा देखील कमाल दाखवू शकला नाही. मिचेल आणि मोइन अली यांनी अर्धशतके तडकावली. त्यांना संघर्ष व्यर्थ गेला. धोनीनं नाबाद २६ धावा केल्या.

या सामन्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं केलेल्या चुका सांगितल्या. तसेच चेन्नईच्या होणाऱ्या पुढच्या सामन्याबाबत संघ सहकारी खेळाडूंना सावधही केलं. चेन्नईचा पुढचा सामना हा रविवारी दुपारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.

क्षेत्ररक्षण गचाळ झालं

सामना संपल्यानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला की, फिल्डिंगच्या आघाडीवर आमच्या पदरी निराशा पडली. आम्ही १० ते १५ धावा जास्त दिल्या असं वाटतं. आम्ही रणनीतीनुसार खेळ केला. त्यावर अंमलबजावणीही झाली. पण गुजरातनं चांगली फलंदाजी केली.

जेव्हा फलंदाज चांगले फटके मारत असेल, चांगली कामगिरी करत असेल तर त्यांना नियंत्रणात आणू शकत नाही. आमचा पुढील सामना चेन्नईत होणार आहे. मोठं आव्हान असेल. आम्हाला एका तगड्या संघाशी खेळायचं आहे. त्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल, असंही गायकवाड म्हणाला.

साई सुदर्शन आणि शुबमन गिलची स्फोटक फलंदाजी

गुजरातकडून साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी धुवाधार फलंदाजी केली. दोघांनी शतके ठोकली. पहिल्या विकेटसाठी तब्बल २१० धावांची भागीदारी केली. सुदर्शनने ५१ चेंडूंत ५ चौकार, ७ षटकारांच्या मदतीने १०३ धावा कुटल्या. तर गिल याने ५५ चेंडूंत १०४ धावा केल्या. त्यात ९ खणखणीत चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

शुबमन गिल सामनावीर

गुजरातचा कर्णधार शुबमन गिल सामनावीर ठरला. तो म्हणाला की, आम्ही कोणतंही लक्ष्य ठरवलं नव्हतं. प्रत्येक षटकात मिळालेल्या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. आम्ही कोणत्याही लक्ष्याचा विचार करत नव्हतो.

साई सुदर्शनच्या सोबत केलेल्या भागीदारीवरही गिल यानं भाष्य केलं. आमच्यात चांगला ताळमेळ आहे. एकमेकांचा खेळ चांगला ओळखू लागलोय. निश्चितच ही पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आम्ही एक वेळ अशी होती की २५० धावा करू असं वाटलं होतं. पण अखेरच्या दोन-तीन षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, असंही तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT