GT vs CSK IPL 2024 pitch report, weather prediction and playing 11 prediction amd2000 twitter
Sports

GT vs CSK,IPL 2024: गुजरातसाठी 'करो या मरो' लढत! GT vs CSK सामन्यात खेळपट्टी कोणाला देणार साथ? कसं असेल हवामान?

GT vs CSK, Weather Prediction And Pitch Report: अहमहाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

अहमहाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने ११ पैकी ४ सामने जिंकले आहेत. ८ गुणांसह हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. तर ११ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी? आणि काय सांगतो हवामानाचा अंदाज.

चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. चेन्नईने आतापर्यंत १२ गुणांची कमाई केली आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नईला २ सामने जिंकायचे आहेत. तर दुसरीकडे गुजरातचा संघ संघर्ष करताना दिसून आला आहे. आज होणाऱ्या सामन्यात गुजरातचा संघ पराभूत झाल्यास प्लेऑफचा प्रवास थांबणार आहे.

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

अहमदाबादच्या मैदानावरील खेळपट्टी ही स्लो आहे. त्यामुळे पहिल्या डावात गोलंदाजांना मदत मिळते. तर सामना जसजसा पुढे जातो, ही खेळपट्टी फलंदाजांना फलंदाजी करण्यासाठी सोपी होत जाते. त्यामुळेच धावांचा पाठलाग करणं या मैदानावर सोपं होऊन जातं. हा रेकॉर्ड पाहता नाणेफेक जिंकणारा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

कसं असेल हवामान?

हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता होणार आहे. या सामन्यावेळी तापमान ३९ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. तर ताशी १३ किमी इतक्या वेगाने वारे वाहतील. चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे, या सामन्यावेळी पाऊस पडणार नाहीये. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT