virat kohli  twitter
Sports

Virat Kohli Viral Video: कोहलीसाठी काहीपण! ग्राऊंडस्टाफ सदस्याने भर मैदानात केलं असं काही की प्रेक्षक पाहतच राहिले

India vs Bangladesh 2nd Test Toss And Playing XI Update: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकला आहे.

Ankush Dhavre

Ground Staff Member Touched Virat Kohli Feet: भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने २८० धावांनी आपल्या नावावर केला.

आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ बांगलादेशचा सुपडा साफ करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे.

तर बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तर बांगलादेशच्या प्लेइंग ११ मध्ये २ बदल करण्यात आले आहेत. दरम्यान हा सामना सुरु होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीची क्रेझ किती आहे, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. विराट कोहली कानपूर कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान हा सामना सुरु होण्यापूर्वी खेळाडूंचा सराव सुरु होता. त्यावेळी विराट मैदानात येत असताना, ग्राऊंड स्टाफमधील एका सदस्याने विराट कोहलीचे पाय धरले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारतीय संघाने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल केलेला नाही. तर बांगलादेशच्या संघात २ मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिला कसोटी सामना खेळलेले तस्कीन अहमद आणइ नाहीद राणाला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवण्यात आले आहेत. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपली स्थिती आणखी भक्कम करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

या सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ११: शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तेजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.

भारतीय संघ आघाडीवर

या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला होता. मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारताने बांगलादेशला २८० धावांनी धूळ चारली होती. या विजयासह भारतीय संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाटील पिता-पुत्र खून खटल्यात कोर्टाचा निकाल, माजी नगराध्यक्ष पवारसह 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: जागर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून धुळे - सोलापूर महामार्गावर टायर जाळून आंदोलन

LPG Gas Cylinder Crisis: शहरात आणि ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळेल गॅस सिलिंडर? सरकारनं दिली नवी अपडेट

Crime: किरकोळ वादातून भयंकर हत्याकांड, तलवारीने सपासप वार करत तरुणाने बायको अन् मुलाला संपवलं

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT