Hardik Pandya celebration saam tv
Sports

Team India: गर्लफ्रेंड माहिका मैदानात धावत आली अन् हार्दिकला Kiss केला, वर्ल्डकप विजयानंतर कपलचा डान्स, पाहा व्हिडिओ

Hardik Pandya celebration: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी२० वर्ल्डकप २०२६ जिंकत इतिहास रचला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडचा ९६ रन्सने पराभव करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला.

Surabhi Jayashree Jagdish

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रविवारी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या ट्रॉफीवर नाव कोरलंय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडचा ९६ रन्सने पराभव करत सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर कोरलंय. टीम इंडियाने २० ओव्हर्समध्ये २५५ रन्स केले होते. यावेळी न्यूझीलंडची टीम १५९ रन्सवर आटोपली. या विजयानंतर टीम इंडियाने मैदानातच सेलिब्रेशनला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.

जय शहाने टीम इंडियाला दिली ट्रॉफी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी आयसीसी टी२० वर्ल्डकप २०२६ ट्रॉफी टीम इंडियाला दिली. जय शाहने कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रॉफी दिली तेव्हा भारतीय खेळाडू मागे सर्व खेळाडू जल्लोष करण्यासाठी उभे होते. सूर्याला ट्रॉफी देताच त्याने ती हवेत उंचावली आणि इतर खेळाडूंसह स्टेडियममध्ये बसलेले सर्वजण आनंदाने नाचू लागले.

हार्दिकचा गर्लफ्रेंडसोबत खास डान्स

जिंकण्याच्या सेलिब्रेशनमध्ये हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांचा डान्सचा व्हिडीओही समोर आला आहे. विजयानंतर हार्दिक पंड्याने त्याची गर्लफ्रेंड माहिकासोबत डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

यावेळी इशान किशन तिरंगा परिधान करून हार्दिकसोबत नाचताना दिसतोय. त्याच्या शेजारी उभी असलेली माहिका शर्मा देखील खूप आनंदाने त्याला डान्समध्ये साथ देताना दिसतेय. इतकंच नाही तर हार्दिक पंड्याच्या गर्लफ्रेंडने मैदानावर येऊन त्याला किस देखील केलं.

मैदानावर धावत येऊन जल्लोष

दरम्यान न्यूझीलंडची शेवटची विकेट पडताच भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ डगआउटमधून मैदानावर धावत मैदानावर आले. यावेळी सर्वांनी एकमेकांना मिठी मारून विजयाचा आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. स्टेडियममध्ये फटाक्यांची आतषबाजी होत असताना चाहत्यांनी इंडिया-इंडियाच्या घोषणा दिल्या.

ट्रॉफीसोबत खास सेलिब्रेशन

विजयानंतर खेळाडूंनी ट्रॉफी उंचावून फॅन्सचं अभिवादन केलं. कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंनी ट्रॉफीसोबत फोटो घेतलं आणि मैदानावरच खास डान्स सेलिब्रेशन केलंय. हार्दिक पंड्यानेही त्याची आयकॉनिक पोस देत सेलिब्रेशन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irregular Menstruation: महिन्यातून दोनवेळा मासिक पाळी का येते? तज्ज्ञांनी सांगितलं किती धोकादायक असू शकते परिस्थिती

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; PM मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT