Good news for Team India Rohit Sharma Shubman Gill Suryakumar Yadav and Virat Kohli bowling in World cup 2023 Saam TV
Sports

World Cup 2023: टीम इंडियात ४ ऑलराऊंडर खेळाडूंची एन्ट्री; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माचं टेन्शन मिटलं

ICC World Cup 2023 Team India: हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्या जागी टीम इंडियात मोहमद शमीची एन्ट्री झाली होती. मात्र, टीम इंडियाला फक्त ५ गोलंदाजांवर अवलंबून राहावं लागत होतं.

Satish Daud

ICC World Cup 2023 Team India

वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडवर १६० धावांनी विजय मिळवला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा हा सलग नववा विजय ठरला. सेमीफायनलच्या दृष्टीने हा विजय फायद्याचा ठरला नसला, तरी या सामन्यात टीम इंडियाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. ज्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन मिटलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल आणि विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने शानदार शतके झळकावली.

जबरदस्त फलंदाजीच्या जोरदावर टीम इंडियाने निर्धारित ५० षटकात ४ विकेट्स गमावून ४१० धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर याने सर्वाधिक नाबाद १२८ धावांची खेळी केली. केएल राहुल याने १०२ धावांची शतकी खेळी केली. शुबमन गिल आणि विराट कोहली या दोघांनी प्रत्येकी ५१-५१ धावांचं अर्धशतकी योगदान दिलं. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा याने देखील ६१ धावा कुटल्या.

४११ धावांचा पाठलाग करताना नेदलँडचा संघ २५० धावाच करू शकला. जसप्रीत बुमराह, मोहमद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजाने भारतासाठी विकेट्स काढल्या. या सामन्यातील खास बाब म्हणजे विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादवने गोलंदाजी केली.

विराट आणि रोहितने प्रत्येकी १-१ विकेट्स देखील घेतली. हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्या जागी टीम इंडियात मोहमद शमीची एन्ट्री झाली होती. मात्र, टीम इंडियाला फक्त ५ गोलंदाजांवर अवलंबून राहावं लागत होतं. त्यामुळे जर महत्वाच्या सामन्यात एखादा गोलंदाज जखमी झाला, तर गोलंदाजी कोण करणार? असा प्रश्न रोहित शर्मा समोर होता. पण सेमीफायनलपूर्वीच आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. रोहित, कोहली, गिल गोलंदाजी करण्यास सज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT