BCCI Job Recruitment saam tv
Sports

BCCI Job Alert: टीम इंडियासोबत काम करायचंय तर संधी सोडू नका! पाहा काय आहे पात्रता, ऑनलाईन कसा भरता येणार अर्ज?

BCCI Job Recruitment: जर तुम्हाला टीम इंडियासोबत काम करायचं आहे तर ही संधी सोडू नका. बीसीसीआयने दोन जागांसाठी भरती काढली आहे. यावेळी कोणी आणि कसा अर्ज करायचा हे पाहा.

Surabhi Jayashree Jagdish

क्रिकेट तुम्हाला आवडत असेल आणि जर तुम्हाला टीम इंडियासोबत काम करायचं असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण भारतीय क्रिकेट बोर्डमध्ये नोकरीची संधी आहे. बोर्डाने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. वुमेंस क्रिकेट टीमसाठी हेड फिजिओथेरेपिस्ट आणि कोचची गरज आहे.

बीसीसीआयने यावेळी नोकरी भरतीसोबत क्विलिफिकेशनची देखील माहिती दिली आहे. यामध्ये या पदभरतीसाठी किती अनुभवाची गरज आहे हे देखील सांगितलंय. या पदांवर भर्ती करणाऱ्या व्यक्ती खेळाडूंचा परफॉर्मंस चांगला व्हावा यासाठी काम करतील. त्याचप्रमाणे कोणत्या खेळाडूला दुखापत असेल तर त्याची रिकव्हरी लवकर होईल यासाठी काम करावं लागणार आहे. बीबीसीआयच्या साईटवर जाऊन फॉर्म भरून अर्ज करता येणार आहे.

दोन पदांसाठी निघाली भर्ती

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने सिनियर विमेंस टीम इंडियामध्ये दोन प्रमुख पदांसाठी भर्ती काढल आहे. यामध्ये पहिलं पद हे हेड फिजियोथेरेपिस्टसाठी आहे. तर दुसर पद हे स्ट्रेंथ एंड कंडिशनिंग कोचसाठी आहे. या दोन पदांवर काम करणाऱ्या व्यक्ती बंगळूरूमध्ये स्थित असलेल्या बीबीसीआय सेंटर ऑफ एक्सिलंसमध्ये काम करतील. एखादी खेळाडू दुखापतग्रस्त झाली तर फिजीओची जबाबदारी वाढणार आहे. यावेळी फिजीओ खेळाडूच्या लवकरात लवकर रिकव्हरीसाठी काम करतील.

फिजीओसाठी काय आहे योग्यता?

स्पोर्ट्स किंवा मस्कुलोस्केलेटल फिजियोथेरेपी/स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज मेडिसिन/स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशनमध्ये स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी अनिवार्य आहे. यासोबत फिजिओथेरेपीमध्ये कमीत कमी १० वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला फिजीओ टीम किंवा एथलीटसोबत काम करण्याचा अनुभव असला पाहिजे.

स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग कोचची काय असेल जबाबदारी?

स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग कोच खेळाडूंना वॉर्मअप शेड्यूल देतील. यासोबतच ते मॅचपूर्वी खेळाडूंकडून प्रॅक्टिस देखील करून घेतील. ते खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवून असतील. या पदासाठी अर्ज करायचा असल्यास संबंधित व्यक्तीला किमान ७ वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्याचसोबत कोणती टीम किंवा एथलीटसोबत काम करण्याचा अनुभव असला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT