Geroge bailey on ms dhoni: एमएस धोनी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आतापर्यंत धोनीने ४ वेळेस चेन्नई सुपर किंग्ज संघाला जेतेपद मिळवून दिले आहे.
तर यावेळी तो आपल्या संघाला पाचवे जेतेपद मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने एमएस धोनीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. (Latest sports updates)
अनेक युवा खेळाडू एमएस धोनीला आपला आदर्श मानतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा धोनी आणि युवा खेळाडूंची भेट होते, तेव्हा ते टिप्स घेताना दिसून येत असतात.
तसेच एमएस धोनीच्या रूमचा दरवाजा देखील उघडाच असतो. मात्र आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेलीने एमएस धोनीबद्दल एक खुलासा केला आहे.
धोनीला आहे हुक्का पिण्याची सवय..
क्रिकेट डॉट कॉम डॉट एयु सोबत बोलताना जॉर्ज बेलीने म्हटले की,' धोनीला हुक्का प्यायला खूप आवडतं. त्यामुळे त्याच्या रुममध्ये नेहमीच हुक्का पॉट असतो. त्याच्या रुमच्या दरवाजा नेहमीच उघड असतो. नेहमीच युवा खेळाडू त्याच्यासोबत चर्चा करताना दिसून येत असतात.'
जॉर्ज बेलीने धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दोघेही या संघातून एकत्र खेळताना दिसून आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.