gautam gambhir and virat kohli saam tv
Sports

Gautam Gambhir On Virat Kohli: 'आम्ही मैदानात भांडतो,पण..' कोहली सोबतच्या वादावर गंभीरने दिले स्पष्टीकरण

Gautam Gambhir And Virat Kohli Fight: आता गौतम गंभीरने या वादावर मोठे वक्तव्य केले आहे.

Ankush Dhavre

Gautam Gambhir: आयपीएल २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभूत करत चेन्नईने जेतेपदाला गवसणी घातली होती.

या संपूर्ण स्पर्धत लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रंगलेला सामना हा चर्चेचा विषय ठरला होता. या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान आता गौतम गंभीरने या वादावर मोठे वक्तव्य केले आहे.

गौतम गंभीर अन् विराट आले होते आमने सामने..

तर झाले असे होते की, आयपीएल २०२३ स्पर्धेतील एका सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामना सुरु असताना, विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले होते.

सामना संपल्यानंतर जेव्हा खेळाडू आणि हात मिळवणी करत होते, त्यावेळी देखील विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर गौतम गंभीरने या वादात उडी घेतली होती.

नवीन उल हकच्या वादानंतर विराट आणि गौतम गंभीरचा वाद सुरु झाला होता. मात्र खेळाडूंनी मध्यस्थी केल्यामूळे हा वाद जास्त चिघळला नव्हता.

कोहलीबाबत बोलताना गंभीर म्हणाला..

विराट कोहलीबाबत बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, 'एमएस धोनी आणि विराट कोहलीसोबत माझं एकसारखंच नातं आहे. आमच्यात जर काही बाचाबाची होत असेल तर ती फक्त मैदानापूर्तीच मर्यादित असते. मैदानाबाहेर असं काहीच नसतं. आमच्यात वैयक्तिक असा वाद नाही.' (Latest sports updates)

तसेच मैदानावर होणाऱ्या वादांवर बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, 'हे पाहा, क्रिकेटच्या मैदानावर माझे अनेक वाद झाले आहेत. मी वाद केले नाहीत, असं मुळीच नाही. मात्र ते वाद क्रिकेटच्या मैदानाबाहेर जाणार नाहीत, याची मी नेहमीच दखल घेतली आहे. दोन लोकांमध्ये जे काही होतं, ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत ठेवलं गेलं पाहिजे. लोकांनी खूप काही म्हटलं. काहींनी टीआरपी मिळवण्यासाठी मला मुलाखतीसाठी बोलावण्याचा देखील प्रयत्न केला. त्यांना असं वाटत होतं की, मी या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Crime: विश्वास नांगरे पाटील यांच्या IA चेहऱ्याआडून मोठी फसवणूक, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ७८ लाखांचा गंडा

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Gold Rates: सोन्याला चकाकी! भावात वाढ झाली की घसरण? सोनं खरेदीपूर्वी वाचा आजचे लेटस्ट दर

LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

Car Tire Pressure: पावसाळ्यात गाडीच्या टायरचा योग्य दाब किती असावा? गाडी चालवताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT