Gautam Gambhir saam tv
Sports

Gautam Gambhir: अर्शदीपला माफी मागायची गरज नव्हती, फायनलमधील झालेल्या राड्यावर गौतम स्पष्टच बोलला

टी20 वर्ल्डकप 2026 च्या फायनलमध्ये अर्शदीप सिंग आणि डॅरेल मिचेल यांच्यात मैदानात वाद झाला. या घटनेनंतर आयसीसीने अर्शदीपवर दंड ठोठावला असून गौतम गंभीरनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाने आयसीसी टी-२० चा वर्ल्डकप जिंकला. मात्र अहमदाबादच्या मैदानात झालेल्या या सामन्यात एक घटना अशी घडली, ज्यामुळे अर्शदीपवर कारवाई देखील झाली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलशी भिडला. अर्शदीपने त्याच्या गोलंदाजीवर मिचेलने मारलेला शॉट रोखला. यानंतर त्याने बॉल मिचेलच्या दिशेने फेकला. हा बॉल जाऊन थेट मिचेलच्या पायावर बसला. या घटनेमुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली.

भर मैदानात घडलेल्या या घटनेदरम्यान सूर्यकुमारने मध्यस्थी करत प्रकरण शांत केलं. दरम्यान, या सामन्यानंतर अर्शदीपने मिचेलची माफीही मागितली. पण आता यावर टीम इंडियाचा प्रमुख कोच गौतम गंभीरने विधान केले असून, अर्शदीपला असं करण्याची गरज नव्हती, असं म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

फायनलच्या सामन्यात अर्शदीप ११ वी ओव्हर फेकण्यासाठी आला होता. त्या ओव्हरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर मिचेलने सलग दोन सिक्स लगावले होते. तर पाचव्या चेंडूवर मिचेलने सरळ शॉट खेळला. अर्शदीपने त्याच्याकडे आलेला हा बॉल रोखला आणि रन आऊट करण्यासाठी मिचेलच्या दिशेने थ्रो केला. मात्र, यावेळी त्याने स्टंपच्या दिशेने थ्रो न करता काहीसा मिचेलच्या दिशेने चेंडू मारला. तो बॉल मिचेलच्या पायाला लागला आणि तो नाराज झाला.

अर्शदीपच्या या कृत्याने मिचेल चिडला होता. त्यावेळी सूर्यकुमारने लगेच मिचेलजवळ येत त्याच्याशी चर्चा केली आणि प्रकरण शांत केलं. आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप अर्शदीपला झाला आणि त्याने फायनल जिंकल्यानंतर मिचेलची माफी मागितली.

गंभीरने काय म्हटलं?

ANI च्या पॉडकास्टमध्ये बोलताना गंभीर म्हणाला की, जर तुम्ही देशाच्या टीमची जर्सी घालता, तर तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल. जर तुम्ही थ्रो बॅक करत असाल, तर त्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. जर तुम्हाला दोन सिक्स बसलेत, तर तुमची ही आक्रमकता योग्य आहे. मी माझ्या खेळाडूंना याच पद्धतीच्या ॲग्रेशनमध्ये पाहू इच्छितो.

गंभीर पुढे म्हणाला की, त्याने जरी सॉरी नसतं म्हटलं, तरीही काही अडचण नव्हती. त्याला माफी मागण्याची काही आवश्यकता नव्हती. क्रिकेटमध्ये कोणी मित्र किंवा शत्रू नसतं. परंतु सोशल मीडियावर अनेक गोष्टी चढवून सांगितल्या जातात.

अर्शदीपवर कारवाई

या घटनेवरून अर्शदीपला आयसीसीने शिक्षा देखील दिली. टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या फायनलदरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या मॅच फीमधून १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट देखील जोडण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT