'हे' चार दिग्गज खेळाडू IPL 2021 मधून बाहेर; संघांच्या चिंतेत वाढ
'हे' चार दिग्गज खेळाडू IPL 2021 मधून बाहेर; संघांच्या चिंतेत वाढ Twitter/ @IPL
क्रीडा | IPL

'हे' चार दिग्गज खेळाडू IPL 2021 मधून बाहेर; संघांच्या चिंतेत वाढ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) युएईमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL) च्या तारखा निश्चित केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. बरेच खेळाडू आपले राष्ट्रीय संघ आणि दुखापतीमुळे संघातून बाहेर आहेत. यामुळे अनेक संघाना मोठा धक्का बसला आहे.

विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंगर्स बेंगलोरचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर इंग्लंडमध्ये दुखापातग्रस्त झाला आहे. त्याचबरोबर केलेआरचा सलामीवीर आणि स्टार खेळाडू शुभमन गिल हा देखील दुखापातग्रस्त झाला आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज आवेश खान इंग्लंडमध्ये झालेल्या सराव सामन्यात दुखापातग्रस्त झाला आहे. दिल्लीचा आणखी एक खेळाडू दुखापातग्रस्त आहे आहे म्हणजे स्टीव्ह स्मिथ त्यामुळे संघांच्या चिंता वाढल्या आहेत.

हे देखील पहा -

आयपीएलचा यंदाच्या हंगामातील पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिला टप्पा कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर आयपीएल होणार की नाही झाली तर कुठे होणार असे अनेक प्रश्न उभे राहिले होते. परंतु त्यानंतर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आणि या चर्चाना ब्रेक लागला. आता 19 सप्टेंबर पासून स्पर्धेच्या दुसऱ्या टप्याला सुरुवात होत आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) युएईमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL) च्या तारखा निश्चित केल्या होत्या. दुसर्‍या टप्प्यातील पहिला सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाईल, तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. बातमी एजन्सी एएनआयशी बोलताना बीसीसीआयच्या अधिककाऱ्यांनी सांगितले होते की ''बीसीसीआय आणि अमीरात क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा झाली. आयपीएलचे उर्वरित सामने दुबई, शारजाह आणि अबू दाबी येथे यशस्वीपणे पार पडतील याचा विश्वास भारतीय नियामक मंडळाला आहे''.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate 29th April 2024: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

SCROLL FOR NEXT