क्रीडा | IPL

Former Cricketer Clyde Butts Dies: दिग्गज क्रिकेटपटूचा कार अपघातात मृत्यू, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

Vishal Gangurde

Former West Indies Cricketer Dies In Car Accident:

क्रिकेट जगतातून एक दु:खद बातमी हाती आली आहे. दिग्गज क्रिकेटपटूचा भीषण कार अपघतात मृत्यू झाला आहे. या क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. वेस्ट इंडिजच्या या माजी क्रिकेटपटूने भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. (Latest Marathi News)

कार अपघातात दिग्गज क्रिकेटपटूचं निधन

वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाचं चेअरमन भूषवलेले, फिरकूपटू क्लाइड बट्स यांचं अपघाती निधन झालं आहे. गुयानाचे माजी कर्णधार आणि वेस्टइंडीजचे ऑफ स्पिनर बट्स यांचा कार अपघातात मृत्यू झाला. वयाच्या ६६ व्या वर्षी बट्स यांनी जगाचा निरोप घेतला. बट्स यांच्या मृत्यूने क्रिकेट चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वेस्टइंडिज क्रिकेटने 'एक्स' अकाउंटवरून माजी क्रिकेटपटू क्लाइड बट्स यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'गुयानाचे माजी कर्णधार आणि वेस्टइंडिजचा ऑफ स्पिनर क्लाइड बट्स यांचे आज सायंकाळी निधन झालं. आम्ही त्यांचे कुटुंब,मित्र यांच्या संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशी पोस्ट वेस्टइंडिज क्रिकेटने केली आहे.

क्लाइड बट्स यांची कारकिर्द कशी होती?

क्लाइड बट्स यांनी १९८० साली वेस्टइंडिज संघात स्थान मिळवलं. संघात पदार्पण करताच बट्सने खेळात चांगली छाप पाडली. तर बट्स यांनी १९८५ साली कसोटी सामन्यात पदार्पण केलं. तर १९८८ साली टीम इंडिया विरोधात शेवटचा सामना खेळला.

बट्स यांनी वेस्टइंडीजसाठी ७ कसोटी सामने आणि १० गडी बाद केले. त्यांनी फर्स्ट क्लासच्या ८७ सामन्यात ३४८ गडी बाद केले आहेत. तर ए लिस्टच्या ३२ सामन्यात बट्सने ३२ सामन्यात ३२ गडी बाद केले आहेत.

वेस्टइंडिजच्या या क्रिकेटपटूचंही झालं निधन

वेस्टइंडिजचा माजी क्रिकेटपटू जो सोलोमन यांचं निधन झालं आहे. जो सोलोमन यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. जो सोलोमन यांचं इंटरनॅशनल क्रिकेट करिअर ७ वर्षांचं होतं. या क्रिकेट करिअरदरम्यान त्यांनी वेस्टइंडिजसाठी २७ क्रिकेट सामने खेळले आहेत. या कारकिर्दीत त्यांनी १ शतक आणि ९ अर्धशतक ठोकत १३२६ धावा केल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Side Effects: नारळ पाणी कोणी पिऊ नये?

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

Tharla Tar Mag: सुभेदार कुटुंबिय साजरा करणार सायली-अर्जुनचा लग्नाचा पहिला वाढदिवस; मालिकेचा नवीन प्रोमो आऊट

Special Report | फडणवीसांची अजित पवारांना जाहीर क्लिन चिट!

SCROLL FOR NEXT