team india twitter
Sports

Ravi Shastri Statement: ... तर १२ वर्षे आणखी वाट पाहावी लागेल; सेमीफायनलपूर्वी दिग्गज खेळाडूची टीम इंडियाला वॉर्निंग

Ravi Shastri Advice To Team India: भारत- न्यूझीलंड सामन्यापूर्वी माजी भारतीय खेळाडूने टीम इंडियाला वॉर्निंग दिली आहे.

Ankush Dhavre

Ravi Shastri Advice To Team India Ahead Of IND vs NZ Match:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेतील ९ पैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना येत्या १५ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध रंगणार आहे. यावेळी भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान सेमीफायनलच्या सामन्यापूर्वी माजी भारतीय खेळाडू रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला चेतावणी दिली आहे.

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. या पॉडकास्टमध्ये बोलताना तो म्हणाला की,'भारतीय संघाने १२ वर्षांपूर्वी वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती. आता भारतीय संघाकडे पुन्हा एकदा ही ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. ज्या पद्धतीने ते खेळताय, ही एक सुवर्णसंधी आहे.'

तसेच ते पुढे म्हणाले की,'आता जर यांनी चूक केली, तर ट्रॉफी जिंकण्यासाठी पुढील ३ वर्ल्डकप वाट पाहावी लागेल. ७-८ खेळाडूंसाठी हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. ज्या पद्धतीने हे खेळाडू खेळ करताय ते पाहता भारतीय संघ वर्ल्डकप जिंकू शकतो.' (Latest sports updates)

भारतीय गोलंदाजांबद्दल बोलताना ते म्हणाले की,'हे विलक्षण आहे, हे एका रात्रीत झालेलं नाही. हे खेळाडू गेल्या ४-५ वर्षांपासून एकत्र खेळताय. सिराजने ३ वर्षांपुर्वी भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. त्याला चांगलच माहीत आहे की, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे. हे गोलंदाजीत सातत्य राखून ठेवल्याने होतं.'

भारत-न्यूझीलंडमध्ये रंगणार सेमीफायनलचा थरार...

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. भारताचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. सेमीफायनलचा हा सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT