cricket  canva
क्रीडा

Cricketer Death: मोठी बातमी! श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची गोळ्या झाडून हत्या

Ankush Dhavre

क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशन याची घरात घूसून हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही अज्ञात लोकांनी धम्मिका निरोशनच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याची पत्नी आणि मुलंही घरात होती. मात्र कसलाही विचार न करता अज्ञातांनी धम्मिका निरोशनवर गोळ्या झाडल्या आणि पळ काढला.

माध्यमातील वृत्तानुसार, तो श्रीलंकेतील अंबालांगोडामध्ये आपल्या घरी होता. त्यावेळी काही अज्ञात लोकं घरात घुसले आणि पत्नी, २ मुलांसमोर गोळ्या झाडल्या. आरोपीने हत्या करुन पळ काढला असून, श्रीलंकेच्या पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. धम्मिका निरोशनने श्रीलंकेच्या अंडर १९ संघाचे नेतृत्व केले होते. वयाच्या ४१ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे.

धम्मिका निरोशनबद्दल सांगायचं झालं, तर त्याने २००० मध्ये श्रीलंकेच्या १९ वर्षाखालील संघासाठी पदार्पण केलं होतं. त्याला श्रीलंकेचं नेतृत्व करण्याची संधीही मिळाली होती. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना श्रीलंकेने सुपर लीग फेरीत स्थान मिळवलं होतं. मात्र लीग फेरीतील सामन्यांमध्ये श्रीलंकेला वेस्टइंडिज, पाकिस्तान आणि भारतीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

धम्मिका निरोशनला केवळ १९ वर्षाखालील संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. दरम्यान त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची संधीही मिळाली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने १२ सामन्यांमध्ये २६९ धावा केल्या. दरम्यान गोलंदाजी करताना त्याने १३ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

Mumbai local train update : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि ट्रान्स हार्बरवर विशेष पॉवर ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

Maharashtra Assembly Elections: ठाकरे - शरद पवार गटात जागावाटपावरून तिढा? 20 जागांवर अडकली मविआची गाडी? मुंबईतल्या बैठकीत काय झाली चर्चा?

Salman khan: सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था, लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आली होती धमकी

SCROLL FOR NEXT