shahid afridi sunil shetty  saam tv
Sports

Shahid Afridi Meets Suniel Shetty: आफ्रिदिने घेतली केएल राहुलच्या सासरेबुवांची भेट; खास भेटीत नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Shahid Afridi And Suniel Shetty Meet: सुनील शेट्टीने पाकिस्तानचा माजी भारतीय क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची भेट घेतली आहे

Ankush Dhavre

Suniel Shetty And Shahid Afridi Viral Video:

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सुनील शेट्टी हा भारतीय क्रिकेटरपटू केएल राहुलचा सासरा आहे. आपल्या जावयाला सपोर्ट करण्यासाठी सुनील शेट्टी हा स्टेडिअममध्ये हजेरी लावत असतो.

नुकताच सुनील शेट्टीने पाकिस्तानचा माजी भारतीय क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची भेट घेतली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुनील शेट्टी आणि शाहिद आफ्रिदी हात मिळवताना दिसून येत आहे. यादरम्यान दोघेही एकमेकांसोबत चर्चा करताना दिसून येत आहे. तसेच शाहिद आफ्रिदी सुनील शेट्टीला आपल्या मुलीची ओळख करून देताना दिसून येत आहे. तो आपल्या मुलींना सुनील शेट्टीला सलाम करा असं म्हणताना दिसून येत आहे.

हा व्हिड़िओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने कमेंट करत म्हटले की, 'शाहिद आफ्रिदी हा माझा बालपणापासूनचा क्रश आहे,तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात हँडसम क्रिकेटपटू आहे' तर दुसऱ्या एका युझरने म्हटले की, ' जेव्हा रिल लाईफचा हिरो रियल लाईफच्या हिरोला भेटतो.' (Latest sports updates)

क्रिकेटच्या मैदानापासून दुर असलेला शाहिद आफ्रिद लवकरच अॅक्शन मोडमध्ये येणार आहे. तो अमेरिकेतील युएस मास्टर टी-१० लीग स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे. या लीग स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू खेळताना दिसून येणार आहे. ज्यात शाहिद आफ्रिदीसह हरभजन सिंग, ख्रिस गेल,सुरेश रैना आणि गौतम गंभीर सारखे खेळाडू खेळताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha: पितृ पक्षात ४ ग्रह बदलणार रास; मेष, मिथुन सह अजून २ राशींचं नशीब फळफळणार

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

SCROLL FOR NEXT