Asad Rauf , former pakistan umpire asad rauf.  Saam Tv
क्रीडा

Asad Rauf : बीसीसीआयनं बंदी घातलेल्या पाकिस्तानी पंच असद रऊफ यांचं निधन

जगातील अव्वल पंचांमध्ये त्यांची गणना हाेत असतं.

साम न्यूज नेटवर्क

Former Pakistan Umpire Asad Rauf Passes Away : पाकिस्तानचे (pakistan) माजी पंच असद रौफ (Asad Rauf) यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) निधन झाले आहे. ते आयसीसी एलिट पॅनलचे पंच होते. तेरा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 231 (cricket) सामन्यांमध्ये पंच म्हणून कामगिरी बजावली.

असद यांनी सन 2000 कालावधीत अंपायरिंगच्या करिअरला सुरुवात केली. सन 2006 मध्ये त्यांचा आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये समावेश झाला. ते जवळपास सात वर्षे आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये होते. जगातील अव्वल पंचांमध्ये त्यांची गणना हाेत असतं.

अलीम दारसह रौफ यांनी पाकिस्तानी पंचांना एक वेगळी ओळख दिली. यापुर्वी पाकिस्तानच्या अंपायरिंगच्या स्तरावर बरीच टीका हाेत असे. रौफ यांनी 1998 मध्ये प्रथमच प्रथम श्रेणी सामन्यात अंपायरिंग केले होते. यानंतर, 2004 मध्ये ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये पोहोचले आणि 2005 मध्ये त्यांना कसोटी सामन्यात अंपायरिंग करण्याची संधी मिळाली.

अंपायरिंग करण्यापूर्वी ते प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते. सन 1980 च्या दशकात 71 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी 3423 धावा केल्या होत्या. त्यांनी 40 लिस्ट ए सामन्यात 673 धावा ठाेकल्या. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या बाबत एक वृत्त प्रसारित झाले हाेते. रौफ हे लाहोरच्या भंगाराच्या बाजारात दुकान चालवतात. तेव्हा रौफ यांनी आता मी क्रिकेटला फॉलो करत नाही असे एका वृत्त वाहिनीस म्हणाले देखील हाेते.

दरम्यान असद यांच्यावर 2016 मध्ये बीसीसीआयने पाच वर्षांची बंदी घातली होती. त्यांना सट्टेबाजांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्याचे आणि 2013 मध्ये आयपीएलमधील मॅच फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्याचे शिस्तपालन समिती समोर आले होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai -Pune Expressway : नियम मोडाल तर टप्प्यात याल! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांवर आता बारीक नजर!

Pankaja Munde : महायुतीतून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? पंकजा मुंडे थेट बोलल्या

Maharashtra News Live Updates: पूजा खेडकर प्रकरण सुनावणी अपडेट : दिल्ली हायकोर्टातील आजची सुनावणी टळली

Team India: विराट- रोहितने आता एकच काम करावं..ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने दिला लाखमोलाचा सल्ला

Cyber Crime : ऑनलाइन जॉबची ऑफर आली, तरूणही भुलला, टप्प्याटप्प्याने पुढे घडलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली!

SCROLL FOR NEXT