shubman gill  saam tv news
क्रीडा

Shubman Gill: 'शुभमन गिलवर अन्याय होतोय..' पाकिस्तानच्या माजी खेळाडूने केली पाठराखण

Ankush Dhavre

Salman Butt Backs Shubman Gill:

अफगाणिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या टी -२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गिलला संघाबाहेर ठेवलं गेलं. त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वालला संघात स्थान दिलं गेलं. या संधीचं सोनं करत यशस्वी जयस्वालने ६८ धावांची तुफानी खेळी केली.

या खेळीनंतर शुभमन गिलचा परतीचा मार्ग कठीण झाला आहे. फॉर्ममध्ये असलेल्या यशस्वी जयस्वालला रोहित बाकावर बसवण्याची चूक रोहित करणार नाही. असं सर्व सुरू असताना पाकिस्तानचा माजी खेळाडू शुभमन गिलची पाठराखण करताना दिसून आला आहे.

गेल्या १४ महिन्यांपासून शुभमन गिल (Shubman Gill) सातत्याने संघासाठी डावाची सुरुवात करतोय. मात्र रोहित शर्माचं कमबॅक झाल्यानंतर संघात बदल झाले आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे की, भारतीय संघाची सलामी जोडी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशननुसार मैदानात उतरणार. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल फिट नव्हता. त्यामुळे शुभमन गिलला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याचं कमबॅक होताच गिलला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. (Latest sports updates)

गिलला माजी पाकिस्तानी खेळाडूचा सल्ला..

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्ट (Salman Butt) म्हणाला की, ' गिल गेल्या काही महिन्यांपासून आपला नैसर्गिक खेळ करू शकलेला नाही. गिल एक चांगला प्लेअर असून तो कौशल्यवानही आहे. मात्र तो घाई करतोय. २० धावा केल्या की, तो मोठा फटका खेळण्यासाठी जातो.

यापूर्वी तो असं करत नव्हता. त्याला खेळपट्टीवर टिकून खेळावं लागेल. त्याला हे समजून घ्यावं लागेल की, तो वर्तमानातील नंबर १ फलंदाज आहे. इतर फलंदाज त्याच्या आसपासही नाही. त्याला खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल.'

गिल उत्तम फलंदाज आहे. मात्र त्याला सलामीला छाप सोडता येत नाहीये. त्याच्याऐवजी जयस्वालला संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. आयपीएल २०२४ स्पर्धेत चांगली कामगिरी करून तो पुन्हा एकदा संघात स्थान मिळवू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT