babar azam saam tv
Sports

Shoaib Akhtar: 'तो फ्रॉड आहे..', माजी क्रिकेटपटूने बाबर आझमची लायकीच काढली

Shoaib Akhtar On Babar Azam: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असलेला पाकिस्तानचा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे.

Ankush Dhavre

अवघ्या ४ दिवसात पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून पॅकअप झाला आहे. न्यूझीलंडने बांगलादेशला हरवल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स खेळाडूंवर संतापले आहेत. तर दिग्गज खेळाडू देखील संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत.

शोएब अख्तरने तर पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझमची लायकीच काढली आहे. पाकिस्तानचे क्रिकेट फॅन्स बाबरला हिरो म्हणून चूक करताय, असेही त्याने म्हटले.

शोएब अख्तरची बाबर आझमवर जोरदार टीका

बाबर आझमवर जोरदार टीका करताना शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सने हिरो म्हणून चुकीच्या व्यक्तीची निवड केली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना भारताने ६ गडी राखून आपल्या नावावर केला होता. त्यानंतर बांगलादेशविरुद्धचा पराभव होताच पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडला.

काय म्हणाला शोएब अख्तर?

एका कार्यक्रमात बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, ' आपण नेहमीच बाबर आझमची तुलना विराट कोहलीसोबत करतो. विराट कोहलीचा हिरो कोण आहे? सचिन तेंडुलकर,ज्याने १०० शतकं झळकावली आहेत. तो त्यालाच फॉलो करतोय. बाबर आझमचा हिरो कोण आहे ? टूक टूक?'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' तू चुकीचा हिरो निवडलाय. तुझे विचारच खराब आहेत. सुरुवातीपासूनच फ्रॉड आहेस. मला पाकिस्तान संघाबद्दल बोलायचं नाहीये. मला केवळ पैसे मिळताय म्हणून मी हे करतोय. हे वेळ घालवण्याचं काम आहे. हा उतरता काळ मी २००१ पासून बघतोय.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT