team india saam tv
Sports

Team India Playing 11: धोनीचा भिडू संघाबाहेर तर संजू सॅमसनला संघात स्थान; पहिल्या वनडेसाठी दिग्गजाने निवडली प्लेइंग ११

Wasim Jaffer's Playing 11 Prediction: माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी भारतीय संघाची प्लेइंग ११ निवडली आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 1st ODI: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर आता भारत आणि वेस्टइंडीज हे दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. मालिकेतील पहिला वनडे सामना २७ जुलै रोजी बार्बाडोसच्या मैदानावर रंगणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघात एकापेक्षा एक खतरनाक खेळाडू आहेत, त्यामुळे प्लेइंग ११ निवडणं रोहित शर्मासाठी कठीण असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी भारतीय संघाची प्लेइंग ११ निवडली आहे.

पहिल्या वनडे सामन्यासाठी वसीम जाफरने निवडली भारतीय संघाची प्लेइंग ११..

वसीम जाफर यांनी निवडलेल्या प्लेइंग ११ मध्ये रोहित शर्माला सलामीवीर फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. तर त्याचा जोडीदार म्हणून शुबमन गिलला संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्या वनडे सामन्यातून ऋतुराज गायकवाडला संघाबाहेर ठेवलं आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने अनेकदा भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे.

मध्यक्रमातून या खेळाडूंना केलं संघाबाहेर..

वसीम जाफर यांनी आपल्या प्लेइंग ११ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी विराट कोहलीची निवड केली आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांनी संजू सॅमसनला संघात स्थान दिले आहे. या प्लेइंग ११ मधून त्यांनी जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या ईशान किशनला प्लेइंग ११ च्या बाहेर ठेवलं आहे. तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्यांनी हार्दिक पंड्याची निवड केली आहे. तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्यांनी सूर्यकुमार यादवला संधी दिली आहे.

अष्टपैलू खेळाडू..

वसीम जाफर यांनी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी रविंद्र जडेजाला संधी दिली आहे. या संघात त्यांनी कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या दोघांना स्थान दिले आहे. (Latest sports updates)

वेगवान गोलंदाज..

वसीम जाफर यांनी वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज आणि उमरान मलिकची निवड केली आहे. मात्र मोहम्मद सिराजला या मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे तो या मालिकेतून बाहेर झाला आहे.

अशी आहे वसीम जाफर यांनी निवडलेली भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुमबन गिल, विराट कोहली, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT