vinod kambli instagram
Sports

Vinod Kambli Viral Video: तेरे बिना भी क्या जीना.. डोळ्याला गॉगल अन् पत्नीचा हात धरत विनोद कांबळींची वानखेडेवर एन्ट्री - VIDEO

Vinod Kambli Entry With His Wife: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने आपल्या पत्नीसह वानखेडे स्टेडियमवर एन्ट्री केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहेत. त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते, ज्यात त्यांची प्रकृती स्थिर नसल्याचं दिसून आलं होतं.

त्यानंतर त्यांना ठाण्यातील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. विनोद कांबळी यांची प्रकृती स्थिर नसताना अनेकांनी त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. आता मुंबईतील वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर, एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खास कार्यक्रमाला विनोद कांबळींनी देखील हजेरी लावली.

दादरच्या शिवाजी पार्कवर झालेल्या एका कार्यक्रमात विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर एकाच मंचावर दिसून आले होते. या कार्यक्रमातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर विनोद कांबळीची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने माजी खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विनोद कांबळींनी देखील हजेरी लावली होती. आता रविवारी जेव्हा कांबळींनी हजेरी लावली, त्यावेळी सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच होत्या.

कांबळींच्या एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विनोद कांबळी सूट-बूट आणि गॉगल घालून घालून डॅशिंग एन्ट्री मारताना दिसून येत आहे. मुख्य बाब म्हणजे, त्याची पत्नी देखील त्याच्यासोबत असल्याचं दिसून येत आहे. त्याची पत्नी एंड्रिया हेविट त्याचा हात पकडून त्याला पुढे घेऊन जाताना दिसली. दोघांचाही हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

स्टार खेळाडूंची हजेरी

अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार राहिलेल्या वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे जल्लोष साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी झालेल्या कार्यक्रमाला रोहित शर्मा, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर आणि अजिंक्य रहाणेसह दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: लहानपणी गाई चरायला घेऊन जायच्या, लग्नासाठी कुटुंबाकडून दबाव, तरीही मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS सी वनमथी यांचा प्रवास

Pitru Paksha 2025 : पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू, या 4 राशींनी वेळीच जाणून घ्या उपाय; अन्यथा...

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT