sourav ganguly Saam TV
Sports

Sourav Ganguly Prediction: हेच ४ संघ सेमीफायनल गाठणार! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी सौरव गांगुलींची भविष्यवाणी

Sourav Ganguly Predicts Top 4 Team Of ICC Champions Trophy: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये जाणार याबाबत भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ८ वर्षानंतर होत असलेल्या या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत.

दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी भविष्यवाणी करायला केली आहे. भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीत कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. यासह पाकिस्तानचा संघ गतविजेता संघ आहे. तरीसुद्धा सौरव गांगुली यांना खात्री आहे की, पाकिस्तानचा संघ टॉप ४ मध्ये प्रवेश करू शकणार नाही.

हे ४ संघ करणार सेमी फायनलमध्ये प्रवेश

सौरव गांगुली यांनी स्पोर्ट्स तकवर बोलताना कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये जाणार याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. गांगुलीच्या मते भारतीय संघ सेमीफायनलमध्ये कन्फर्म जाणार. यासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. मात्र त्यांनी न्यूझीलंडचा या ४ संघात समावेश केलेला नाही. सौरव गांगुली यांनी केलेली भविष्यवाणी किती खरी ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

स्पर्धेला केव्हा होणार सुरुवात

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याने होणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना २३ फेब्रुवारीला रंगणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक...

19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई

21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी

26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर

27 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची

2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई

5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर

9 मार्च - फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)

10 मार्च - राखीव दिवस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT