sachin tendulkar  
Sports

Vinesh Phogat Disqualification: 'विनेश फोगाटला सिल्व्हर मेडल मिळायलाच हवं..' मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पाठींबा

Sachin Tendulkar On Vinesh Phogat: भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने विनेश फोगाटला समर्थन करणारी पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान त्यानेही विनेश फोगाटला पाठींबा दिला आहे.

Ankush Dhavre

कुस्तीमध्ये भारताचं हक्काचं मेडल निसटलं. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) ५० किलो ग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलच्या दिवशी १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे तिला फायनलचा सामना खेळता आला नाही. हक्काचं मेडल निसटल्यानंतर भारतीय फॅन्स जोरदार विरोध करताना दिसून आले. दरम्यान तिला रौप्य पदक देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) तिला समर्थन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले की,' प्रत्येक खेळाला ठरलेले नियम असतात. कदाचित कधीकधी नियमांबाबत पुनर्विचारही केला गेला पाहिजे. विनेश फोगाटने योग्य आणि प्रामाणिकपणे खेळून फायनलमध्ये प्रवेश केला होता. वजन जास्त असल्यामुळे फायनलपूर्वी तिला रौप्य पदकापासून वंचित ठेवण्यात आलं, हे कोणत्याही तर्काला किंवा क्रीडा भावनेला धरुन नाही. '

तसेच त्याने पुढे लिहिले की, 'जर एखाद्या खेळाडूने खेळातील कामगिरी चांगली व्हावी म्हणून निषिद्ध औषधांचा वापर केला असेल,तर त्याला पदक न देता शेवटी ठेवणे हे समजून घेता येतं. मात्र विनेशने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत फायनलमध्ये स्थान मिळवले होते. त्यामुळे तिला रौप्यपदक मिळायलाच हवं. '

विनेशने CAS कडे मागितली दाद

ऑलिम्पिक फायनलपूर्वी अपात्र ठरवण्यात आलेल्या विनेश फोगाटने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS)कडे दाद मागितली आहे. तिने रौप्यपदक देण्याची मागणी केली आहे. तिने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. जर निर्णय विनेश फोगाटच्या बाजूने लागला, तर विनेश फोगाटला रौप्य पदक दिलं जाईल. दरम्यान ऑलिम्पिक फायनलच्या दुसऱ्याच दिवशी विनेश फोगाटने आंतरराष्ट्रीय कुस्तीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

सचिन तेंडुलकरसह अमेरिकेच्या गोल्ड मेडलिस्ट खेळाडूनेही विनेश फोगाटला रौप्यपदक मिळायला हवं, अशी मागणी केली होती. त्यानेही आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत विनेश फोगाटला समर्थन केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT