Vinesh Phogat Disqualification: विनेशला सिल्व्हर मेडल मिळणार? तक्रार केल्यानंतर CAS ने घेतली दखल

Vinesh Phogat News In Marathi: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने CAS कडे मागणी केली होती. ही तिने केलेल्या अर्जाची दखल घेण्यात आली आहे.
Vinesh Phogat Disqualification: विनेशला सिल्व्हर मेडल मिळणार? तक्रार केल्यानंतर CAS ने घेतली दखल
vinesh phogattwitter
Published On

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील ७ ऑगस्ट हा दिवस कोणीच विसरु शकणार नाही. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने ५० किलोग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. मात्र पॅरिसमधून मोठी बातमी समोर येत आहे. अपात्र ठरवल्यानंतर तिने CAS कडे दाद मागितली होती. दरम्यान तिने केलेला अर्ज स्वीकार करण्यात केला असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Vinesh Phogat Disqualification: विनेशला सिल्व्हर मेडल मिळणार? तक्रार केल्यानंतर CAS ने घेतली दखल
IND vs SL : श्रीलंकेत भारताची नाचक्की, २७ वर्षानंतर पहिल्यांदाच दारुण पराभव

नेमकं काय घडलं?

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील ५० किलो ग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात सहभाग घेतला होता. तिने पहिल्या दिवशी ३ सामने जिंकले. यादरम्यान तिने वर्ल्ड नंबर १ खेळाडूला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलच्या दिवशी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. तिला अपात्र ठरवल्यानंतर देशभरातून तिला न्याय मिळवून देण्याची मागणी केली गेली होती.

विनेशने रौप्यपदक देण्याबाबत CAS कडे याचिका केली होती. विनेशने ५० किलो ग्रॅम वजनासह फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे तिने CAS कडे याचिका दाखल करत रौप्यपदक देण्याची मागणी केली होती. ही याचिका CAS ने स्वीकारली असून उद्या म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता याबाबत निर्णय दिला जाणार आहे.

Vinesh Phogat Disqualification: विनेशला सिल्व्हर मेडल मिळणार? तक्रार केल्यानंतर CAS ने घेतली दखल
Paris Olympics 2024: नीरज चोप्राचं सुवर्णपदकावर लक्ष; भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या, काय आहे पॅरिस ऑलिम्पिकचं आजचं वेळापत्रक?

निवृत्तीची केली घोषणा

अपात्रतेच्या निर्णयानंतर विनेश फोगाटने कुस्तीला रामराम केला आहे. तिने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. तिने निवृत्ती घेतली असली, तरीदेखील पदक मिळण्याची आशा अंतिम निर्णय येईपर्यंत कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com