Ravi Shastri Viral Video Twitter
Sports

Ravi Shastri Viral Video: रवी शास्त्रींनी पाकिस्तानी गोलंदाजांची LIVE मॅचमध्ये इज्जत काढली, VIDEO तुफान व्हायरल

Ravi Shastri Viral Video: भारत -पाकिस्तान सामन्यानंतर रवी शास्त्री यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Ravi Shastri On Shaheen Afridi:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पार पडला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत ८५ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजाची धुलाई करत चौफेर फटकेबाजी करत भारताला जोरदार विजय मिळवून दिला.

या विजयानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

एकेकाळी पाकिस्तानच्या गोलंदाजी अटॅकमध्ये एकापेक्षा एक धुरंदर गोलंदाज होते. मात्र वर्तमान पाकिस्तान संघातील गोलंदाजांमध्ये ती धार दिसत नाही. दरम्यान भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान भारतीय गोलंदाज चमकले. तर पाकिस्तानच्या गोलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही.

पाकिस्तान संघातील प्रमुख गोलंदाज शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यावेळी समालोचन करत असलेल्या रवी शास्त्री यांनी म्हटले की,'लोकं मला बोलतात की,पाकिस्तानचा गोलंदाज अटॅक सर्वात मजबूत अटॅकपैकी एक आहे. मात्र असं काहीच नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. नसीम शाह खेळत नाहीये आणि पाकिस्तानचा स्पिन अटॅक असा आहे, शाहीन आफ्रीदी काही वसीम अक्रम नाही. लो नवीन चेंडूने गोलंदाजी करू शकतो... तो विकेट काढू शकतो... तो चांगला गोलंदाज आहे मात्र त्याला इतकं डोक्यावर घेण्याची गरज नाही. तर तो ठिक ठाक आहे तर त्याला ठिक ठाकच बोलावं लागेल. याचा स्वीकार करावाच लागेल.' (Latest sports updates)

भारतीय संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजीत ती धार पाहायला मिळाली नाही.सुरूवातीच्या २ षटकांमध्येच भारतीय फलंदाजांनी स्कोअर बोर्डवर २२ धावा लावल्या होत्या.

ज्या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव १९२ धावांवर गुडांळला, त्याच खेळपट्टीवर पाकिस्तानचे गोलंदाज भारताच्या ५ फलंदाजांनाही बाद करू शकले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT