dodda ganesh twitter
क्रीडा

Kenya Coach: महिनाभरापूर्वी हेड कोच म्हणून नियुक्ती झालेल्या दिग्गजाला अचानक काढलं, कारण काय?

Ankush Dhavre

भारताचे माजी क्रिकेटपटू गणेश डोडा यांची केनियाच्या मुख्य प्रशिकक्षकपदी निवड करण्यात आली होती. मात्र महिन्याभराच्या आतच त्यांना या पदावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १४ ऑगस्ट रोजी डोडा गणेश यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. मात्र आता त्यांना या पदावरुन काढून टाकण्यात आलं आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, डोडा गणेश यांना एक पत्र मिळालं, ज्यात लिहिलं होतं की, त्यांनी नियुक्तीच्या नियमांचं पालन केलेलं नाही. त्यामुळे त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यांची केनिया संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती.

या पत्रात म्हटलं गेलं आहे की,' ७ ऑगस्ट २०२४ रोजी मनोज पटेल आणि तुमच्यात झालेला कथित करार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला संघातील खेळाडूंना प्रशिक्षण देता येणार नाही.'

हा निर्णय केनिया क्रिकेट बोर्डचे अधिकारी, पर्लिन ओमामी यांच्या हातून लिखित स्वरुपात पाठवण्यात आला. मात्र त्यांना काढण्याचं नेमकं कारण काय?हे अजूनही समजू शकलेलं नाही. डोडा गणेश यांना मुख्य प्रशिक्षकपदावरुन काढल्यानंतर, लेमेक ओनयांगो आणि जोसेफ अंगारा यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

अशी राहिलीये कारकिर्द

डोडा गणेश यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी शानदार कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १०४ सामन्यांमध्ये त्यांनी ३६५ गडी बाद केले. तर लिस्ट ए क्रिकेटमधील ८९ सामन्यांमध्ये त्यांनी १२८ गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब; बघा काय म्हणाले बच्चू कडू

Ahmednagar Firing Case : कोपरगावात भरदिवसा गोळीबार, VIDEO

Bachelor Party Destination : लग्नाआधी मित्रांसोबत चिल करायचंय? 'या' ठिकाणी प्लान करा बॅचलर पार्टी

Congress Protest: राहुल गांधींचा अपमान सहन करणार नाही, वाचाळवीरांना लगाम घाला; काँग्रेसचं आंदोलन, भाजपला इशारा

Maharashtra News Live Updates: मी निवडणूक लढण्यावर ठाम - माजी पोलीस आयुक्त संजय पांडे

SCROLL FOR NEXT