1983 च्या विश्वचषकातील 'हिरो' यशपाल शर्मा यांचे निधन झाले Saam Tv
क्रीडा

1983 च्या विश्वचषकातील 'हिरो' यशपाल शर्मा यांचे निधन

यशपाल शर्मा (वय 66) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे निधन. यशपाल शर्मा (वय 66) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. यशपाल हे भारताच्या 1983 च्या विश्वचषक (1983 World Cup) विजेत्या संघाचे सदस्य होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही शुन्यावर बाद न झालेले यशपाल शर्माने आता या जगाला कायमचा निरोप देऊन गेले आहेत.

11 ऑगस्ट 1954 रोजी लुधियाना येथे जन्मलेले क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांनी 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये खेळलेल्या 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग होते, जिथे भारताने वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. 1985 मध्ये आपल्या कारकीर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारे यशपाल शर्मा सात वर्षांच्या कालावधीत कधीही शून्यावर बाद झाले नाहीत.

उजव्या हाताचे फलंदाज यशपाल शर्मा आपल्या कारकीर्दीत 42 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 40 डावात त्यांनी 883 धावा केल्या तर 9 वेळा नाबाद राहिले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ते कधीही शतक ठोकू शकला नाहीत, परंतु त्यांनी 4 अर्धशतक केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वाधिक धावसंख्या 89 आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी 61 धावांची अतुलनीय खेळी खेळली, त्या जोरावर भारताने अंतिम फेरी गाठली होती.

त्याचबरोबर यशपाल शर्मांच्या कसोटी कारकीर्दीबद्दल बोलताना त्यांनी 1979 ते 1983 पर्यंत एकूण 37 कसोटी सामने खेळले. ज्यात त्यांनी 59 डावांमध्ये एकूण 1606 धावा केल्या आहेत. यात त्यांनी दोन शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत. यशपाल शर्मा गोलंदाजी देखील करायचे, परंतु गोलंदाज म्हणून त्यांना फारसे यश मिळू शकले नाही. कारण यशपाल यांना क्रिकेटच्या दोन्ही स्वरूपात फक्त एकच बळी घेण्यास यश आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT