'माजी उपपंतप्रधानांनी मला बळजबरी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले' Saam TV
Sports

'माजी उपपंतप्रधानांनी मला बळजबरी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले'

या टेनिस स्टारच्या दाव्यावर झांग गाओली यांनी अद्याप काहीही स्पष्टिकरण दिलेले नाही.

वृत्तसंस्था

चिनी टेनिस स्टार पेंग शुईने निवृत्त कम्युनिस्ट नेत्यावर लैंगिक छळाचा जाहीर आरोप केला आहे. चिनी सोशल मीडिया साइट Weibo वर एका पोस्टमध्ये, पेंग म्हणाली की, माजी उपपंतप्रधान झांग गाओली यांनी तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी "बळजबरी" केली होती. चीनमध्ये पहिल्यांदाच कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांनंतर, दुहेरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या पेंग शुईबद्दल चीनमध्ये 'इंटरनेट सर्च' देखील मर्यादित केले आहेत.

या टेनिस स्टारच्या दाव्यावर झांग गाओली यांनी अद्याप काहीही स्पष्टिकरण दिलेले नाही. चीनी सरकारने वेबोवर केलेली पोस्ट इंटरनेटवरून पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. झांग गाओली, जे 2013 ते 2018 पर्यंत चीनचे उपपंतप्रधान होते, ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे जवळचे सहकारी होते.

सोशल मीडियावर काय लिहिले ?

टेनिसपटू पेंगने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'उपपंतप्रधान झांग गाओली मला माहित आहे की तुमच्यासारखी प्रतिष्ठित व्यक्ती म्हणेल की तुम्ही घाबरत नाही हे दगडावर खडे पडल्यासारखे दिसत असले तरी मी तुमच्याबद्दल सत्य सांगत आहे.' पेंगने लिहिले की झांग गाओली यांनी तिला टेनिस खेळण्यासाठी बोलावले तेव्हा तिला पहिल्यांदा जबरदस्ती करण्यात आली, 'मी त्या दिवशी माझी संमती दिली नाही. मी सतत रडत होतो. तुम्ही मला तुमच्या घरी घेवून गेले आणि मला पुन्हा संबंध ठेवण्यास भाग पाडले.'

पेंगने असेही लिहिले की ती तिच्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे देऊ शकणार नाही. तिने लिहिले, 'माझ्याकडे पुरावा नाही. आणखी पुरावे मिळणे अशक्य होते कारण तुम्हाला नेहमी भीती वाटत होती की पुरावे गोळा करण्यासाठी मी टेपरेकॉर्डर सारखे काहीतरी आणीन त्यामुळे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्ड नाही. मला फक्त वास्ताविक अनुभव आहे.'

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEED: मॅरेथॉनसाठी हायवेवर धावण्याची प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शिक्षकांची अजब उत्तरं; VIDEO व्हायरल

Video : लोकसभेत गदारोळात मला मारहाण केली, जोरात ढकललं; महिला खासदाराचे केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

Online Gaming Regulation Bill: ऑनलाइन गेमिंगचा सरकारकडून 'गेम'; दोन्ही सभागृहात ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

SCROLL FOR NEXT