Shruti Vilas Kadam
मोराची नक्षी ही पारंपरिक आणि रॉयल लूक देणारी असते. साध्या साडीवर असा ब्लाऊज परिधान केल्यास संपूर्ण लूक उठून दिसतो.
मोराच्या डिझाईनमध्ये झरी, रेशीम धागा, सीक्विन किंवा स्टोन वर्कचा वापर केला जातो. त्यामुळे ब्लाऊज अधिक आकर्षक आणि सणासुदीला योग्य ठरतो.
मोराची नक्षी बॅक साइडला मोठ्या डिझाईनमध्ये केली जाते. डीप बॅक, डोरी स्टाइल किंवा बटण डिझाईनमुळे ब्लाऊज अधिक स्टायलिश दिसतो.
हिरवा, निळा, गोल्डन आणि पर्पल अशा रंगांमध्ये मोराची नक्षी विशेष खुलते. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज निवडल्यास साधी साडीही आकर्षक दिसते.
सिल्क, रॉ सिल्क, कॉटन सिल्क किंवा व्हेल्वेट फॅब्रिकवर मोराची नक्षी सुंदर दिसते. सण, लग्नसमारंभ किंवा पार्टीसाठी हा उत्तम पर्याय आहे.
मोराच्या नक्षीचे ब्लाऊज पारंपरिक साड्यांसोबत तसेच मॉडर्न ड्रेपिंग स्टाइलमध्येही छान दिसतात. त्यामुळे तो बहुपयोगी पर्याय ठरतो.
आपल्या आवडीनुसार मोराची सिंगल नक्षी, जोडी नक्षी किंवा हाफ स्लीव्ह/फुल स्लीव्ह डिझाईन निवडता येते. कस्टमाईज्ड डिझाईनमुळे लूक अधिक खास बनतो.