'त्या' विमानातून पडलेल्या नागरिकांत अफगाणिस्तानच्या फुटबाॅलपटूचा मृत्यू  Saam Tv
क्रीडा

'त्या' विमानातून पडलेल्या नागरिकांत अफगाणिस्तानच्या फुटबाॅलपटूचा मृत्यू

वृत्तसंस्था

अफगाणिस्तानातून (Afganistan War) एक विमान अनेक लोकांना घेवून निघाले होते. त्या विमानातून पडून राष्ट्रीय युवा संघासाठी खेळणारा अफगाण फुटबॉलपटूचा (Afgan Footballer) मृत्यू झाला आहे. अशी माहिती एका माध्यामाने दिली आहे. काबुलमधून (Kabul Airport) उड्डाण घेतलेल्या अमेरिकन विमानाच्या चाकांवर बसलेल्या काही लोक पडतानाचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तीन लोक पडताना दिसले होते त्यातलाच एक होता हा फुटबॅालपटू. त्याचे नाव झाकी अनवरी होते तो अफगाणिस्तानचा तरुण फुटबॉलपटू होता.

अफगाणिस्तानमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणारी जनरल डायरेक्टरेट ऑफ फिजिकल एजुकेशन अँड स्पोर्ट्स ऑफ अफगाणिस्तान ने गुरुवारी झाकी अनवरीच्या मृत्यूची बातमी दिली होती. संस्थेने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले, "इतर हजारो तरुणांप्रमाणेच अनवरी लाही देश सोडायचा होता पण अमेरिकन विमानातून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे." तालिबान्यांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर हजारो लोकांनी देश सोडला आहे. अजूनही मुळ अफगाण नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, सोमवारी अफगाणिस्तानमधून तालीबानच्या विकृतीचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. त्यातलाच एक व्हिडिओ काबुल विमानतळावरचा होता. अनेक लोक विमानात चढण्याचा प्रयत्न करताना धक्काबुक्की करताना दिसले. काही लोक विमानाच्या चाकावर तर काही लोक पंख्यावर बसले होते. एक अमेरिकन विमान आपल्या लोकांसह उड्डाण करण्यासाठी रनवे सोडत असताना, काही अफगाणी लोक विमानाच्या मागे धावत होते आणि त्यातील काही त्याच्या पंखांवर चढले. नंतर एका व्हिडिओमध्ये लोक विमानातून खाली पडताना दिसले. या सी -17 अमेरिकन विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेहाचे अनेक तुकडे चिकटलेले आढळले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT