क्रिकेट विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. माध्यमातील वृत्तानूसार झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू हिथ स्ट्रिक यांनी ४९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. बुधवारी त्यांच्या निधनाची बातमी येताच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. ते गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते.
हिथ स्ट्रिक यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. झिम्बाब्वे संघाला अनेकदा जोरदार कामगिरी करुन त्यांनी विजय मिळवून दिला आहे.
झिम्बाब्वे संघाचे कर्णधार..
हिथ स्ट्रिक यांनी झिम्बाब्वे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी संघाचे नेतृत्व करताना देखील जबरदस्त कामगिरी केली होती. २००० साली त्यांना झिम्बाब्वेच्या वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली होती. यादरम्यान त्यांनी अनेकदा झिम्बाब्वे संघाच्या विजयात मोलाची भुमिका बजावली होती.
माध्यमातील वृत्तानूसार हिथ स्ट्रिक यांनी कॅन्सरची लागण झाली होती. कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर असल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वेच्या स्वास्थ्य मंत्र्यांनी हिथ स्ट्रिकबाबत बोलताना म्हटले होते की, त्यांच्या तब्यतीत कुठलीही सुधारणा होत नाहीये. (Latest sports updates)
असा राहिलाय रेकॉर्ड..
हिथ स्ट्रिक यांच्या नेतृत्वाखाली खेळताना झिम्बाब्वेने २१ पैकी ४ कसोटी सामने जिंकले आहेत. तर ११ कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ६८ वनडे सामन्यांमध्ये झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व करताना त्यांनी १८ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. तर ४७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
त्यांच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी १९९० धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी २९४३ धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी २९.८२ च्या सरासरीने २३९ गडी बाद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.