Australia Vs India Final
Australia Vs India Final  ICC x
क्रीडा | IPL

U-19 World Cup Final: 'या' कारणांमुळे अंतिम सामन्यात युवा टीम इंडियाचा झाला पराभव

Bharat Bhaskar Jadhav

Australia Vs India Final U-19 World Cup Reasons Of India Defeat:

संपूर्ण स्पर्धेत दमदार कामिगिरी करणाऱ्या युवा भारतीय खेळाडूंनी अंतिम सामन्यात खराब प्रदर्शन केलं. अंतिम सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी फ्लॉप ठरली. गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली नाही. एकट्या राज लिंबानीशिवाय कोणत्याच गोलंदाजाला चांगलं उत्कृष्ट अशी कामगिरी करता आली नाही. गोलंदाजांच्या खराब गोलंदाजीमुळेच ऑस्ट्रेलियाला अंडर१९ वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारता आली. कोणत्या ५ मोठ्या चुका भारतीय संघाने केल्या ज्यांमुळे भारताच्या हातातून वर्ल्डकपची ट्रॉफी निसटली, ते जाणून घेऊ.(Latest News)

गोलंदाजी खराब

भारताच्या पराभवाचे पहिले कारण म्हणजे गोलंदाजी. राज लिंबानी व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोलंदाजाला विशेष कामगिरी करता आली नाही. राज लिंबानीने आपल्या १० षटकात ३८ धावा देत ३ बळी घेतले, तर नमन तिवारीने ६३ धावा देत २ बळी घेतले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारताची टॉप ऑर्डर अपयशी

भारतीय संघाची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. भारताला पहिला धक्का सलामीवीर अर्शीनच्या रूपाने बसला. त्यानंतर मुशीर खानलाही संघाचा डाव सांभाळता आला नाही. सलामीवीर आदर्श सिंग क्रीजवर टिकून राहिला पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्याचे अर्धशतक हुकले.

कर्णधार ठरला अपयशी

भारताचा कर्णधार उदय सहारन याने अंडर-१९ विश्वचषकाच्या संपूर्ण स्पर्धेत खूप धावा केल्या. पण अंतिम सामन्यासारख्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. धडपणारा संघाचा डाव सुद्धा त्याला सांभळता आला नाही. अंतिम सामन्यात त्याने १८ चेंडूत ८ धावा केल्या. या सामन्यात त्याला कर्णधारपदाची जबाबदारी व्यवस्थितपणे संभाळता आली नाही.

विकेटांची घसरगुंडी

कर्णधार उदयच्या विकेटनंतर एकाही खेळाडूला धावपट्टीवर स्थिरावता आले नाही. फक्त मुरुगन अभिषेकने एकवेळ संघाचा डाव सांभाळला. अभिषेकने सामना फिरवू शकतो असे सर्वांना वाटत होतं त्याच्या नशीबाने त्याची साथ दिली नाही आणि तोही ४२ धावा करून बाद झाला.

भागीदारी झाली नाही

भारतीय संघातील खेळाडूंना भागीदारी रचता आली नाही. कारण सतत विकेट पडल्यामुळे भागीदारी रचण्याची संधी कोणत्याच फलंदाजाला मिळाली नाही. आदर्श आणि मुशीर खान यांच्यात सर्वाधिक ३७ धावांची भागीदारी झाली. त्याच जागी ऑस्ट्रेलियासाठी हॅरी डिक्सन आणि विव्हगेन यांच्यात ७८ धावांची भागीदारी झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

Nawazuddin Siddiqui Net Worth : एकेकाळी वॉचमॅनची नोकरी करणारा नवाज आज आहे कोट्यवधींचा मालक

Chhagan Bhujabal News | मविआचा 35 जागांचा दावा भुजबळांनी असा खोडून काढला..

Delhi Metro: पुन्हा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल; लेडीज कोचमध्ये मुलीचा अश्लील डान्स Watch video

Shakuntala Railways | अबब! चोरट्यांनी थेट रेल्वे ट्रॅकच पळवला!

SCROLL FOR NEXT