Misbah ul Haq  ESPN
क्रीडा

World cup final Prediction: वर्ल्डकप २०२३ चा अंतिम सामना 'या' दोन संघांमध्येच होणार; मिसबाह-उल-हकचे भाकीत

World cup Final : पाकिस्तानचे माजी कर्णधार मिसबाहने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याविषयी भाकीत केलं आहे. या दोन्ही संघांनी वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केलीय.

Bharat Jadhav

World cup final Prediction:

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार मिसबाह उल हकने वर्ल्ड कप २०२३ च्या अंतिम सामन्याविषयी भाकित केलं आहे. त्याच्या भाकितनुसार भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे. म्हणजेच काय भारत आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सेमि फायनलचा सामन्यात न्यूझीलंडचा पराभव होईल. कारण यावेळी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होईल, असं भाकित पाकिस्तानचे माजी कर्णधार मिसबाहने व्यक्त केलं आहे. (Latest News)

दरम्यान या दोन्ही संघांनी वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केलीय. भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, तर दक्षिण आफ्रिकेचा संघाला केवळ एकाच सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. मिसबाहशिवाय पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकनेही फायनलबाबत भाकित केले होते. मलिकच्या मते, २०२३ च्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होऊ शकतो. दरम्यान वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरीचे सामने १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईत तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाईल. यानंतर १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये वर्ल्ड कपचा ​​अंतिम सामना होणार आहे. दरम्यान भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना १२ नोव्हेंबर रोजी नेदरलँड्ससोबत होणार आहे.

या सामन्यातही विजय मिळवून भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम ठेवले, अशी अपेक्षा आहे. वर्ल्ड कप २०२३ च्या सामन्यात झालेल्या सामन्यांमध्ये टीम इंडियाचा एकदाही पराभव झालेला नाहीये. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची कामगिरी पाहून सर्वजण चकित झाले आहेत. भारताने प्रत्येक विभागात १०० टक्के कामगिरी केलीय. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : इंजिनाचा वेग मंदावला! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

SCROLL FOR NEXT