FIFA World Cup 2026 saam tv
Sports

FIFA World Cup 2026 : फायनल सामन्यात मेस्सीची जादू पडली फिकी; फेरान टोरेसच्या निर्णायक गोलने स्पेनने 16 वर्षांनी जिंकला वर्ल्डकप

Argentina vs Spain: फिफा वर्ल्ड कप 2026च्या अंतिम सामन्यात स्पेनने अतिरिक्त वेळेत फेरान टोरेसच्या निर्णायक गोलच्या जोरावर अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव केला. या विजयासह स्पेनने 2010 नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला, तर अर्जेंटिनाचं सलग दुसऱ्या विजेतेपदाचं स्वप्न भंगलं.

Surabhi Jayashree Jagdish

फिफा वर्ल्ड कप 2026च्या अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करत वर्ल्डकपवर पुन्हा एकदा नाव कोरलंय. अमेरिकेतील न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियमवर रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत अतिरिक्त वेळेत फेरान टोरेसने (Ferran Torres) 106व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. या विजयासह स्पेनने 2010 नंतर तब्बल 16 वर्षांनी दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप जिंकला. तर सलग दुसरे विजेतेपद पटकावण्याचे अर्जेंटिनाचे स्वप्न अपूर्ण राहिलंय.

सामन्याचा पहिला हाफ अत्यंत चुरशीचा झाला आणि दोन्ही टीम्सना एकही गोल करता आला नाही. मात्र स्पेनने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अर्जेंटिनावर दबाव कायम ठेवला. पहिल्या हाफमध्ये स्पेनने लक्ष्यावर दोन अचूक फटके मारले, तर अर्जेंटिनाला एकही शॉट ऑन टार्गेट नोंदवता आला नाही.

बॉल पॉझेशनमध्येही स्पेनचं वर्चस्व राहिलं आणि तब्बल 65 टक्के वेळ चेंडू त्यांच्या ताब्यात होता. स्पेनच्या डिफेंसने लिओनेल मेस्सीला प्रभावीपणे रोखलं. यावेळी अर्जेंटिनाचा खेळाडू लिसांद्रो मार्टिनेझला यलो कार्ड मिळालं. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं आणि त्याच्या जागी निकोलस ओटामेंडी मैदानात उतरला.

निर्धारित 90 मिनिटांत दोन्ही टीमला गोल करता न आल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. दोन्ही टीमने अनेक संधी निर्माण केल्या. मात्र अखेर 106व्या मिनिटाला फेरान टोरेसने मिळालेल्या संधीचं सोनं करत गोल धाडला आणि स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उर्वरित वेळेत स्पेनच्या डिफेंसने अर्जेंटिनाचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि अंतिम शिट्टी वाजताच स्पेनने वर्ल्डकपवर शिक्कामोर्तब केलं.

मेस्सीची जादू पडली फिकी

स्पेनने दुसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कप विजेतेपद जिंकलं आहे. यापूर्वी स्पेनने 2010 मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला होता. दुसरीकडे, अर्जेंटिनाला चौथ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी हुकली. सलग दोन वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम अर्जेंटिनाला करता आला नाही.

यापूर्वी इटलीने 1934 आणि 1938 मध्ये, तर ब्राझीलने 1958 आणि 1962 मध्ये सलग दोन वेळा वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं. फायनलच्या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी अपेक्षित प्रभाव पाडू शकला नाही. या सामन्यात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना त्याची खेळाडू जादू पाहायला मिळाली नाही.

कसा होता दोन्ही टीम्सचा प्रवास

अंतिम फेरीपर्यंतचा दोन्ही टीम्सचा प्रवास तितकाच कठीण होता. स्पेनने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत फ्रान्स तसंच पोर्तुगालसारख्या बलाढ्य टीम्सना पराभूत करत अंतिम फेरी गाठली. तर अर्जेंटिनाने सलग तीन बाद फेरीतील सामने अतिरिक्त वेळेत जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंदोलनामधील काही लोकांना नीट काय आहे, हेही माहिती नाही - देवेंद्र फडणवीस

Crime: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी अर्धनग्न अवस्थेत कालव्यात आढळला तरुणीचा मृतदेह

Dengue Vaccine : भारताला मिळाली पहिली डेंग्यू लस, 'या' वयाच्या लोकांनाच घेता येणार डोस; जाणून घ्या सर्वकाही

CJP Protest : "आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे..."; महाराष्ट्राच्या दादा-वहिनीचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, रितेश-जिनिलियाची पोस्ट चर्चेत

Chhatrapati Shivaji Maharaj: सूरतेच्या मोहिमेनंतर मिळालेला अमाप ऐवज छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे लपवला होता?

SCROLL FOR NEXT