FIFA WC 2022
FIFA WC 2022 Saam TV
क्रीडा | IPL

FIFA World Cup 2022 : रिकार्लिसनच्या रिव्हर्स गोलची जगभर चर्चा; फुटबॉल समजत नसेल तरी VIDEO पाहून तोंडून वाह निघेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

FIFA World Cup 2022: FIFA विश्वचषक 2022मध्ये ब्राझीलचा स्ट्रायकर रिकार्लिसनने गुरुवारी रात्री अप्रतिम गोल केला.सर्बियाविरुद्धच्या सामन्यात त्याने विंची ज्युनियरच्या पासवर तीन डिफेंडर्समध्ये उभे राहून अॅक्रोबॅटिक सिझर किक मारली.

रिकार्लिसनचा गोल सध्या फिफा विश्वचषक 2022 मधील सर्वात आकर्षक गोल म्हणून ओळखला जात आहे. रिकार्लिसनचा हा शॉट 'गोल ऑफ द टूर्नामेंट' ठरू शकतो, असं देखील बोललं जात आहे. (Football)

पाच वेळा विश्वविजेता ब्राझीलचा सामना गुरुवारी सर्बियासमोर होता. फर्स्ट हाफमध्ये एकही गोल होऊ शकला नाही, मात्र सेकंड हाफमध्ये ब्राझीलचा फॉरवर्ड रिकार्लिसनने दोन दमदार गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

रिकार्लिसनने 62व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली आणि त्यानंतर 73व्या मिनिटाला व्हिन्सी ज्युनियरच्या पासवर एक अप्रतिम गोल नेटमध्ये पाठवला.

संपूर्ण सामन्यात ब्राझीलचा दबदबा दिलसा. ब्राझीलने सर्बियाच्या गोलपोस्टवर 24 वेळा आक्रमण केले, त्यापैकी 10 टार्गेटवर होते. सर्बियाचा गोलकीपर मिलिन्कोविकने काही शानदार सेव्ह केले आणि त्यामुळेच पराभवाचे अंतर केवळ 2 गोल राहिले. दुसरीकडे, सर्बियाचे फॉरवर्ड्स केवळ 4 प्रयत्न करू शकले. कॉर्नर आणि फ्री किक मिळवण्यातही ब्राझीलचा संघ पुढे होता. ब्राझीलला 6 कॉर्नर आणि 12 फ्री किक मिळाल्या. दुसरीकडे सर्बियाला 4 कॉर्नर आणि 8 फ्री किक मिळाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Health: शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; आमदार रोहित पवारांनी दिली महत्वाची माहिती

MS Dhoni Record: वयाच्या ४२ व्या वर्षी धोनीचा मोठा कारनामा! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच यष्टीरक्षक

Amravati News : शिवपुराण कथेच्या कलश यात्रेदरम्यान महिलेचा मृत्यू

Marathi Vs Gujarati News | गुजराती बहुल सोसायटीत मराठी माणसांना बंदी, ठाकरे गटाचा आरोप

Hair Care Tips: केसांचा Freezyness घालवण्यासाठी 'या' सेप्या टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT