FIFA WC 2022 Saam TV
Sports

FIFA WC 2022: सेनेगलचा दणका, कतारचं टेन्शन वाढलं; सलग दोन धक्के यजमान संघाला विश्वचषकातून बाहेर फेकणार?

पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळावर नजर टाकली, तर निश्चितपणे सेनेगलचा संघ अधिक वरचढ होता.

साम टिव्ही ब्युरो

FIFA World Cup 2022:  फिफा विश्वचषक 2022 यजमान कतारला स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सेनेगलने कतारला ३-१ अशा फरकाने पराभूत केले आहे.

सेनेगलने संपूर्ण सामन्यात आपले वर्चस्व कायम ठेवलं आणि कतारला फार कमी संधी मिळाल्या. सलग दुसऱ्या पराभवामुळे यजमान देशाचे पुढील फेरीत जाण्याचे स्वप्नही भंगले आहे. (Football)

सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेनेगलने कतारवर दबाव आणण्यास सुरुवात केली आणि पहिल्या 10 मिनिटांत 2-3 उत्कृष्ट अटॅक केले. पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळावर नजर टाकली, तर निश्चितपणे सेनेगलचा संघ अधिक वरचढ होता.

सेनेगलने कतारला अटॅक करण्याच्या फार कमी संधी दिल्या. 41व्या मिनिटाला पहिला गोल करत सेनेगलने सामन्यात आघाडी घेतली. बुलाये डियाने बॉल गोलपोस्टमध्ये टाकला. फर्स्ट हाफमध्ये कतारचा संघ सतत संघर्ष करताना दिसला.

सेकंड हाफमध्येही सुरुवातीलाच सेनेगलने आणखी एक गोल करत कतारच्या अडचणी वाढवल्या. तिसर्‍याच मिनिटाला कॉर्नरवर हेडरद्वारे फमारा दिध्यूने अप्रतिम गोल करून सेनेगलची आघाडी 2-0 अशी केली. कतारने सुमारे 15 मिनिटांनंतर दोन उत्तम संधी निर्माण केल्या, परंतु दोन्ही वेळा त्या संधी गमावल्या.

कतारने 78व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना रोमांचक केला. इस्माईल मोहम्मदच्या क्रॉसवर मोहम्मद मुंतारीने शानदार हेडरद्वारे कतारसाठी हा गोल केला. त्यानंतर पाच मिनिटांनी सेनेगलने उत्तम चाल केली आणि बँबा डिएंगने शानदार फटकेबाजी करत सेनेगलला 3-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT