FIFA World Cup 2022, Morocco Vs Spain  Twitter/@FIFAWorldCup
Sports

FIFA World Cup : फिफा विश्वचषकात मोठा उलटफेर; स्पेन वर्ल्डकपमधून बाहेर, मोरक्कोने रचला इतिहास

कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात मोठा उलटफेर झालाय. सातव्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये मोरोक्कोच्या संघांने बलाढ्य स्पेनचा पराभव केलाय.

Satish Daud

FIFA World Cup 2022, Morocco Vs Spain : कतारमध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात मोठा उलटफेर झालाय. सातव्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये मोरोक्कोच्या संघांने बलाढ्य स्पेनचा पराभव केलाय. या पराभवासह स्पेनचा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला. तर मोरक्कोचा संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. स्पेनचा संघ सलग दुसऱ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. गेल्या विश्वचषकात सुद्धा स्पेनला रशियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. (Latest Marathi News)

सामन्यांत नेमकं काय घडलं?

मोरक्कोसारखा लहान देश स्पेनसारख्या बलाढ्य संघाला कसा झुंजवू शकतो, हे विश्वचषकाच्या आजच्या सामन्यात पाहायला मिळाले. सामन्याच्या पहिल्या सत्रात स्पेनने आक्रमक पवित्रा घेत मोरक्कोच्या खेळाडूंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण, मोरक्कोच्या संघाने स्पेनला चोख प्रत्त्युतर दिलं. त्यामुळे पहिल्या सत्राचा स्कोअर ०-० असा राहिला. (FIFA World Cup 2022)

पहिल्या सत्राचा खेळ बरोबरीत सुटल्याने दुसऱ्या सत्रात नेमकं काय होणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. दुसऱ्या सत्रात हा सामना चांगलाच चुरशीचा झाला. कारण, दुसऱ्या सत्रात मोरक्कोचे मनोबल कमालीचे उंचावलेले दिसले आणि त्यामुळेच त्यांनी स्पेनच्या तोडीस तोड खेळ केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. मोरक्कोचा संघ हा गोल करण्यासाठी स्पेनच्या संघावर तुटून पडत होता. स्पेनवर त्यांनी एकामागीन एक आक्रमणं लगावली. पण यामध्ये त्यांना एकदाही यश मिळाले नाही. अखेर दुसऱ्या सत्रातही स्कोअर ०-० असा राहिला.

निर्धारित ९० मिनिटांत एकही गोल न झाल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळ संपल्यानंतर स्कोअर ०-० असा राहिला. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये झाला. मोरोक्कोने पेनल्टी शूटआऊटमध्ये धम्माल करत स्पेनचा ३-० असा पराभव केला.

मोरोक्कोच्या विजयाचा हिरो निश्चितच गोलरक्षक यासिन बोनो हा ठरला. यासिनने शूटआऊटमध्ये स्पेनला एकही गोल करू दिला नाही आणि एकूण तीन सेव्ह केले. पेनल्टी शूटआऊटमध्ये मोरोक्कोकडून अब्देलहामिद साबिरी, हकीम झिएच आणि अश्रफ हकीमी यांनी गोल केले. फक्त बी. बेनौनला गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे स्पेनला पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह स्पेनचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT