IND vs BAN 2nd ODI: टीम इंडिया पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज; कुठे पाहता येईल दुसरा सामना?

बांगलादेशकडून मेहदी हसन मिर्झाच्या नाबाद 38 धावांच्या जोरावर संघाने एक विकेटने सामना जिंकला.
IND vs BAN
IND vs BANSaam TV
Published On

IND vs BAN : बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला (Team India) पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तीन एकदिवसीय मालिकेत बांगलादेश 1-0ने पुढे आहे. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ मालिका 1-1 ने बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी खूपच निराशाजनक होती आणि अवघ्या 186 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. मात्र, प्रत्युत्तरात बांगलादेशचीही अवस्था अशीच झाली होती. (Sports News)

IND vs BAN
Team India : टीम इंडियात मोठी उलथापालथ, हेड कोचला हटवलं; 39 शतके ठोकणाऱ्या खेळाडूची एन्ट्री

मात्र नवव्या विकेटसाठी मेहदी हसन आणि मिस्तफिजूरने 51 धावांची भागिदारी करुन विजय नोंदवला. बांगलादेशकडून मेहदी हसन मिर्झाच्या नाबाद 38 धावांच्या जोरावर संघाने एक विकेटने सामना जिंकला.

फलंदाजी सोडली असली तरी या सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी भेदक होती. या सामन्यात मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या तर कुलदीप सेन आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.

IND vs BAN
Ind vs Ban 2nd ODI : दुसऱ्या वनडेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का; बाहेर होऊ शकतो मॅचविनर खेळाडू

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवार, 7 डिसेंबर रोजी होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जाईल.

सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरू होईल तर नाणेफेक सकाळी 11 वाजता होईल. सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल.

सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार?

सोनी लिव्ह अॅपवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या वनडेचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com